भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेकडून उपविभागीय अधिाऱ्यांना निवेदन खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी

 

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका येथील मोळा मोळी या गावी झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ तसेच निरपराध लोकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावे; तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीपभाऊ गवई यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साहेब मेहकर यांना निवेदन !

तालुक्यातील मोळा मोळी येथे पोळ्याच्या सणाच्या दिवशी बौद्ध बांधवांवर सवर्ण समाजातील काही लोकांनी तोरणाखाली बैल का आला म्हणून त्यांना जबर मारहाण केली होती,जखमी झालेल्या बौद्ध समाजातील लोकांनी तात्काळ जानेफळ येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना तेथील पोलिसांनी ताटकळत दोन ते तीन तास बसवले, त्यानंतर आरोपीवर अनुसूचित जाती कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले तसेच बौद्ध बांधवांवर सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले, वास्तविक पाहता बौद्ध बांधवांचा यामध्ये काडीचाही गुन्हा नाही परंतु त्यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले या घटनेचा निषेध म्हणून मेहकर येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीपभाऊ गवई यांचे नेतृत्वामध्ये दिनांक 03/09/2022 रोजी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये असे म्हटले आहे की बौद्ध बांधवावरील जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावे,तसेच आरोपींना तात्काळ अटक करावी,

यावेळी निवेदन देताना तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई,गौतम नरवाडे,संदिप राऊत,नागेश म्हस्के,राधेश्याम खरात,व तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व मेहकर येथील समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Comment