भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता यांचे महाराष्ट्रातील बहुजन समाजाला जाहीर आवाहन

 

भीम आर्मीचे १५ मार्च पासून घर घर चलो सदस्यता अभियान

यावल (प्रतिनिधी).विकी वानखेडे,-

१३- बामसेफ संस्थापक कांशीराम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने १५ मार्च ते ३० मार्च या पंधरवड्यात घर घर चलो सदस्यता अभियान राबविण्यात येणार आहे. बहुजन समाजाला सत्तेत घेऊन जाणारे कांशिराम यांच्याविषयी माहीती देतानाच विविध कार्यक्रम यावेळी राबविण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ते रमाकांत तायडे यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशात बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणारे बामसेफ डिसफोर व बसपाचे संस्थापक कांशिराम यांचा येत्या १५ मार्च रोजी ८३ वी जयंती आहे.या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र भीम आर्मीने सलग पंधरा दिवस कोरोनाचे नियम पाळत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे, व्याख्याने परीसंवाद, मेळावे, बैठका,नवीन शाखा उद्घाटने,महाराष्ट्र भीम आर्मीच्या 21 सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी
आदी विविध कार्यक्रम राबवविण्याचा निर्णय घेतला आहे .शिवाय चलो भीम आर्मी की ओर अंतर्गत सलग पंधरा दिवस घरघर चलो सदस्यता अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियाच्या माध्यमातून बहुज समाजाला त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती तायडे यांनी दिली.
भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे , महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनील गायकवाड व मुख्य महासचिव सीताराम गंगावणे यांच्यासह महाराष्ट्र भीम आर्मीची संपूर्ण टीम या अभियानात सक्रियपणे सहभाग नोंदविणार असून बहुजन समाजातील नागरीकांनीही यात सहभाग नोदवावा असे आवाहन तायडे यांनी केले आहे.

Leave a Comment