स्थानिक भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात असताना शेवटची सभा दिनांक १८-११-२०२२ रोजी शेगाव येथे संपन्न होणार आहे ,या पार्श्वभूमीवर गेल्या एक तारखेपासून शेगाव शहरात लगबग सुरू झाली असताना काँग्रेस पक्षाचे सर्वच बडे नेते शेगाव मध्ये येत जात असल्याचे दिसत होते तर या निमित्ताने संपूर्ण शेगाव शहर काँग्रेस मय झाल्याचे दिसत असताना आज सकाळ पासून या सभेला काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी राष्ट्रवादी चे शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हजेरी लावतील तर अशी चर्चा सुरू आहे ,तर या संदर्भात असे की महाविकास आघाडी स्थापन होऊन तीन वर्ष झाले आहेत आणि अश्यातान महविकस आघाडीची एकजूट दाखवून विरोधना एकप्रकारे शक्तिप्रदर्शन दाखवण्या साठी काँग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना या सभेचे आमंत्रण दिल्या मुळे या सभेमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तीन ही मोठे नेते एकत्र येऊ शकतात यात शंका नाही ,सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद पवार यांची उपस्थिती राहील असे समजते तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची आगामी काळात बुलढाणा जिल्ह्यात जाहीर सभा असल्या मुळे या विषयी स्पश्ट मत सांगता येणार नाही ,अवघ्या तीन दिवसावर सभा असताना आता मोठ्या नेत्यांची उपस्थितीच्या चर्चेने तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात उत्साहाचे वातावरण दिसत आहे हे मात्र नक्की