भारतीय संविधान वाचविण्यासाठी लढा द्या हिच महामानवांना खरी मानवंदना ठरेल- संगितराव भोंगळ

 

विश्वरत्न भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी सकल धर्मासाठी प्रेरणा दिली.आज महामानवांची जयंती आहे मात्र, या प्राश्वभुमीवर डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगिकारत भारतीय संविधान वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारतीय संविधान वाचविण्यासाठी लढा द्या हिच महामानवांना खरी मानवंदना ठरेल अशी प्रतिक्रिया बुलढाणा जि.प.चे माजी उपाध्यक्ष संगितराव उपाख्य राजु पाटिल भोंगळ यांनी दिली.

आज भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अनुषंगाने सामाजिक सेवा संकल्पनेतुन धम्मक्रांती नवयुवक मंडळ जस्तगाव येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीराचे उध्दघाटक म्हणून बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते संगितराव भोंगळ [राजु पाटिल] यांनी उपरोक्त विचार मांडले उध्दघाटक म्हणुन बोलतांना ते म्हणाले की, भारतरन्त डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीय नागरिकांला न्याय दिला.

उपेक्षित घटकांना शैक्षणिक प्रवाहात आणले महिलांना सन्मान दिला. माणसाला ‘माणुस’ म्हणुन जगण्याचा अधिकार दिला. त्यांचे विचार आणि त्यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. महामानवांना डोक्यावर नको तर डोक्यात घेण्याची गरज आहे. डाॕ.बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला जिवंत ठेवले आज त्यांना त्यांच्या विचारांचा जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संविधान वाचविण्याच्या चळवळीत सर्वांनी ऐकत्र यायला हवे. ही महामानवांना खरी मानवंदना ठरेल असे विचार संगितराव भोंगळ यांनी मांडले.
या आरोग्य शिबीराला डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन व पुष्पाहार अर्पण संगितराव भोंगळ यांचे हस्ते करण्यात आले.

या वेळी डाॕ.विलास चौधरी,डाॕ.नेताजी बोडके,डाॕ.अतुल नायसे,डाॕ.डि.व्ही तायडे,डाॕ.संजय शेगोकार,डाॕ.विजय दुतोंडे,डाॕ.पवन चव्हाण,डाॕ.शुभम मंडवाले,डाॕ.अतुल वानखडे आदी आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांनी शिबीरात सेवा दिली.

प्रमुख उपस्थिती विश्वासराव डोसे,शालिग्राम वानखडे,ज्ञानेश्वर पुंडे, भीमराव भिलंगे, कपिल डोसे(प्र सरपंच),अंबादास गौलखडे,संतोष डोसे, समाधान वानखडे, नांगोराव पाटील, हरिभाऊ पुंडे, पंजाबराव वानखडे, धनराज ससाने,पप्पु पठाण,समाधान वानखडे,प्रभाकर झांबरे,प्रतीक्षाताई डोसे,राहुल वानखडे जगन गवांदे, प्रकाश तायडे,सुभाष अंदुरकर,रामधन साबे,भगवान वानखडे,शामराव वानखडे,गजानन चोपडे,मिलिंद गवांदे,संतोष वाकोडे,धम्मदीप गव्हांदे,भूषण राव वानखडे,आशिष वानखडे,भीमराव वानखडे,शत्रुघ्न वानखडे,रतन सोनोने, संतोष दाभाडे,संतोष चांदणे,पुंडलिक डोसे, आम्रपाल भिलंगे, कैलास पुंडे,विशाल वानखडे जितेंद्र वानखडे,राष्ट्रपाल वानखडे,नागोराव आटे,उत्तम हातेकर, निलेश पाटील व गावकरी मंडळी उपस्थित होते.

या आरोग्य तपासणी शिबिरात सर्व गावकरी मंडळी ज्येष्ठ मंडळी व गावालगतच्या गावातील लोकांनी या आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरात उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी केली.

Leave a Comment