भारतीय संविधान दिनानिमित्य प्रदीपकुमार नागपुरकर यांचे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, नांदगांव येथे विद्यार्थांना हस्ताक्षर सुधाराचे धडे

 

सचिन वाघे प्रतिनिधि

हिंगणघाट:- येथील बहुआयामी व्यक्तिमत्व युवा-संस्कार मासिकाचे संपादक तथा भारतभर हस्ताक्षर सुधार प्रकल्प प्रचारक म्हणून लाखो विद्यार्थी वर्गाचे हस्ताक्षर सुधार करणारे प्रदीपकुमार नागपुरकर यांचे जिल्हा परिषद संचालित पंचायत समिति, हिंगणघाट अंतर्गत नांदगांव(बोरगांव) उच्च माध्यमिक शाळा येथील वर्ग ५ ते ८ चे विद्यार्थांना भारतीय संविधान दिनानिमित्य भारतीय युवा संस्कार परीषदेचे वतीने एक दिवसीय हस्ताक्षर सुधार शिबीराचे आयोजन *चला हस्ताक्षर सुधार व संविधान वाचन करु* या उपक्रमा अंतर्गत स्वयम हस्ताक्षर सुधार वर्गाचे मार्गदर्शक प्रदीपकुमार नागपुरकर यांनी विद्यार्थी भावा-बहिनींना *”मी सरळ, माझी रेषा सरळ, रेषा सरळ, माझे अक्षर सुलेखन सरळ यासह जीवन सरळ”* हा मुलमंत्र देत प्रयोगात्मक भुमिका समजावून सांगतांना विद्यार्थ्यांना सोप्या व सहज भाषेत ग्रामगीता, दासबोधात सांगितलेले ओव्यांचा कित्ता देत सरळे, वाटोळे (गोलाकार) व मोकळेपणा हा त्रिसूत्री प्रयोग देवून हस्ताक्षर सुधार करण्याचे तंत्र-मंत्र विद्यार्थ्यांनकडून गिरवून घेतले. .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगांव शाळेचे मुख्याध्यापक शंकर निमसरकार, तर प्रमुख मार्गदर्शक प्रदीपकुमार नागपुरकर व सतिश घोडे गुरुजी प्रमुख अतिथी, शिबीर वर्ग संयोजक अंकित दारुंडे, यासह शाळेचे माजी विद्यार्थी साहिल बुरबुरे,सुमित तेलंग, हर्षल, जयेश बुरबुरे,आदी मान्यवर मंचासीन होते.हस्ताक्षर वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक प्रदीपकुमार नागपुरकर यांनी एक दिवसीय दोन तासाच्या सत्रात विद्यार्थ्यांना अक्षरात प्रयोगात्मक बदल घडवून जीवन कसे सरळ जगता येते हे अक्षराच्या सरळ समांतर रेषांचा परिपाठ शिबीरार्थी विद्यार्थी वर्गाकडून करवून घेतला.*सुंदर लिहिणे अक्षर ओळी, स्पष्ट वाचणे पुस्तक सगळी। जरा न दिसावी टाळाटाळी, कुठेही विद्यार्थ्यांची।।* रेषा सरळ उंची समान अक्षराचा यातच प्राण हा सिध्दांत देत नागपुरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वर्गाचे सुत्रसंचालन अभय लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षल थुल याने मानले, यशस्वितेसाठी संकल्प पाटिल, अभिजीत फुसाटे, सुजीत दारुंडे, मिहिर खोंडे, जयदेव दारुंडे, भोला मस्कर, प्रशांत वादाफळे, सिमा बेले, ज्योति महाबुधे, मिनाक्षी घोडमारे, वनमाला तेलंग, माया वाघमारे, आदीने सहकार्य केले.

Leave a Comment