भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे साजरी,विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम संपन्न.

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

घोट(गडचिरोली):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न,महामानव,विश्वपंडित, महाज्ञानी,बोधिसत्व,परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य एम एन राव होते तर विशेष प्रतिनिधी उपप्राचार्य राजन गजभिये,गट साधन केंद्र चामोर्शी चे साधनव्यक्ती चांगदेव सोरते,संसाधन शिक्षक रवी खेवले,शाळेचे शिक्षक भराडे हे होते.
दरम्यान विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तर रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा व वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.गुणानुक्रमे आलेल्या स्पर्धेमधील विजेत्यांना प्राचार्य,उपप्राचार्य,साधनव्यक्ती व मान्यवरांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीत गायन केले निवडक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे विशेष अतिथी चांगदेव सोरते यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले. संस्थेचे प्राचार्य एम एन राव व उपप्राचार्य राजन गजभिये यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment