भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी हिरोळे पेट्रोल पंपा शेजारी नगर परिषदेच्या मालकीचे जागा मिळावी,

 

सम्राट चे अध्यक्ष आशिष खरात यांचे नगर परिषदेला निवेदन ।

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्याच प्रमाणे यापूर्वी सन 1996 – 97 च्या काळात बुलढाणा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता,मात्र कला संचालन विभाग पुणे यांनी दोन्ही महामानवांचे पुतळे दोषपूर्ण असल्याचा निर्वाळा दिला होता प्रमाणपत्रही दिले होते ‘त्यानंतर जिल्हा परिषद यांनी ते दोन्ही महामानवांचे पुतळे हटवले होतेत्यानंतर दोन्ही महामानवांचे पुतळे बुलढाणा शहरामध्ये बसण्यात यावे यासाठी विविध संघटना विविध सामाजिक कार्यकर्ते आंदोलने करीत आहेत मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही,ही शोकांतिका म्हणावी लागेल,छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी अनेक आंदोलने शिवप्रेमींनी केली व त्यांच्या आंदोलनाला यश आल्याचे आज दिसत आहे .त्याच प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुद्धा बुलढाणा शहरामध्ये उभारला तर बुलढाणा शहरामध्ये दोन्ही महामानवांचे पुतळे बसून एक वेगळेपण येईल ‘ व सौंदर्यत यामध्ये सुद्धा भर पडेल,बुलढाणा शहरातील भीम अनुयायी यांची मागणी आहे की बुलढाणा शहरामध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा सध्या बुलढाणा शहरात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी निधी जमा करण्यासाठी भीम अनुयायी प्रयत्नशील आहेत तसा निधी सुद्धा जमा होईल यात शंका नाही ‘म्हणून हिरोळे पेट्रोल पंपाच्या शेजारील बुलढाणा नगर परिषदेच्या मालकीची असलेली जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी समाज बांधवांना द्यावी ‘अशी मागणीसुद्धा यावेळी सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष खरात यांनी दिनांक 3मार्च रोजी नगरपरिषद ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

Leave a Comment