उदैभान दांडगे
विदर्भ प्रतिनिधि
आज सकाळपासून विविध पक्ष संघटनाचा आंदोलनात्मक पवित्रा ..
संग्रामपूर ; केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसेच विविध पक्षातील संघटना एकवटल्या आहेत.* हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. या पृष्ठभूमीवर संग्रामपूर तालुक्यातील विविध पक्ष संघटनाने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून बंदचा परीणाम जाणवू लागला आहे तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ भोंगळ जिल्हा नेते सत्यव्रत कारांगले नारायन ढगे, शिवसेना शांताराम भाऊ दाणे जिल्हाध्यक्ष,रविभाऊ ता अद्यक्ष तर मार्कवादी कॉमोनिस्ट संघटनेचे अनिल गायकवाड जिल्हा सचिव,वंचित आघाडीचे देविदास दामोदर व राष्ट्रीय काँग्रेसचे राजेंद्र वानखडेअध्यक्ष ता.अभयसिंग मारोडे , शामभाऊ डाबरे,मनोहर बोराखडे,तेजराव मारोडे असे विविध पक्ष , संघटना,शेतकरी व व्यापारी वर्ग यांनी आपले दुकाने बंद ठेऊन या बंध मध्ये मोठया संख्येने उपस्तीत राहून आपला पाठींबा नोंदविला पोलिस स्टेशन तामगाव यांनी विविध पक्षातील पाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे