भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी .

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री बी. एम. हजारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री विशाल सुरासे, संचालक विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद, श्री दत्तात्रय सुरासे, कैलास सोनवणे, दिलीप पगार, हरिभाऊ सुरासे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद रिंढे यांनी तर आभार श्री रोहिदास त्रिभुवन यांनी मानले. या प्रसंगी भरत निंबाळकर , सागर राजपूत , श्रीमती जयश्री बोर्डे आदींसह शिक्षकेत्तर कर्मचारी समाधान सुरासे , ज्ञानदेव तायडे, अमोल त्रिभुवन उपस्थित होते.

Leave a Comment