अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक
ही वृद्ध घरात एकट्या असलेल्या ८० वर्षीय वृद्धेचा गळा दाबून खून करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात घडली.
भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खुन्याचा शोध सुरू केला आहे.
संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात मंगळवारी (१९ जानेवारी) भरदिवसा दुपारच्यावेळी चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने ८० वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला.
सावित्राबाई मोगल शेळके असे या वृद्धेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.
कौठेकमळेश्वर गावात संगमनेर रस्त्याच्याकडेला सावित्राबाई मोगल शेळके ही वृद्धा हारात एकटी राहात होती.
तिचे घराजवळ गोळ्या-बिस्कीटचे छोटे दुकान असून तिचा शिवणकाम व्यवसाय करत होती. ती मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घरात एकटीच असताना अज्ञात चोरट्याने तिच्या घरात प्रवेश केल.
घरात घुसून दागिने चोरीच्या उद्देशाने त्याने वृद्धेचा गळा दाबून खून केला.
त्याच वेळी या वृद्धेच्या घराजवळ राहणारी एक पाच वर्षाची बालिका गोळ्या घेण्यासाठी त्या ठिकाणी आली असता तिने हा प्रकार बघितला.
व त्यानंतर चोरट्याने या बालिकेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडले व तिच्या अंगावर गोधड्या आणि कापडे टाकून तो घरातून पसार झाला.
5 वर्षीय बालिकेचा कानातील दागिने ओरबडल्याने कान जखमी झालेली व घाबरलेली ही बालिका त्यानंतर आजी-आजी म्हणत तिच्या घराकडे पळाली.
त्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी वृद्धेच्या घराकडे धाव घेतल्यावर संपूर्ण प्रकार उघड झाला.
स्थानिक रहिवाशांनी चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.तो पर्यंत चोट्या पसार झाला होता.
त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पोलीस फौजफाटा घेवून घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी ठसे तज्ञांचे पथक व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.
दुसरी बातमी पण एका क्लिक बातमी
https://www.suryamarathinews.com/post/8117
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार अधिक तपास करीत आहे.
चोरटा एक होता की एकापेक्षा अधिक याचा शोध पोलीस घेत आहेत. भरदिवसा दुपारच्यावेळी चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने वृद्धेचा गळा दाबून खून करण्याची घटना घडल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.
गावात पूर्ण पणे या घटनेचे चर्चा सुरू आहे