बौध्द समाज स्मशानभूमी दुरुस्तीसाठी संग्रामपुर नगर पंचायत विरोधात नागरिकांचे भिक मांगो आंदोलन

 

 

संग्रामपुर नगरपंचायतच्या गलथान कारभारामुळे बौद्ध समाज स्मशानभूमी दुरुस्तीसाठी आज नागरिकांनी नगर पंचायत विरोधात  भिक मांगो  आंदोलन छेडण्यात आले..

संग्रामपुर येथील बौध्द स्मशानभूमी च्या दुरुस्ती करण्यासाठी बौध्द समाज बांधवांनी वेळोवेळी निवेदन दिले. दि 4/09/2020 रोजी निवेदन देवुनही 09/10/2020 पर्यंत काम चालू झाले नाही त्यामुळे दि 12/10/2020 रोजी संग्रामपूर शहरात भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु संग्रामपुर नगर पंचायत प्रशासनाने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज दि 12/10/2020 रोजी संपूर्ण शहरात भिक मांगो अंदोलन करण्यात आले.. भिक मधे जमा झालेली 1920 रोख रुपयांची रक्कम नगरपंचायत कार्यलयात मुख्याधिकारी तसेच अध्यक्ष उपस्थित नसल्याने संग्रामपूर नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्या खाली खुर्चीसमोरील टेबलवर ठेवून देण्यात आले..तरी नगर पंचायत प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर संपुर्ण जिल्ह्य़ात संग्रामपुर नगर पंचायत च्या विरोधात भिक मांगो अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे..

 

Leave a Comment