संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथील ३० वर्षीय सिद्धार्थ कोकाटे यांचा किडनी आजाराने शेगाव येथे शासकिय रुग्णालयात डायलीसेस करतांना मुत्यू झाला खारपान पट्ट्याचा शाप लागलेल्या संग्रामपूर तालुक्यात आतापर्यंत किडनीच्या आजाराने शेकडो बळी गेले असून शेकडो रुग्णांना किडनी आजाराने ग्रासले आहे. व कित्त्येक रुग्णांना मुतखड्याचा सुद्धा त्रास निर्माण झाला आहे. आरोग्य विभाग किडनी रोगासाठी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहेत. संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त किडनी आजाराने बळी गेले असून आजसुद्धा शेकडो रुग्णांना किडनी रोगाची लागण आहे. आरोग्य विभाग कडे कोणत्याच प्रकारची नोंद नाही हि वस्तुस्थिती असतांना आरोग्य विभाग कडून उपाय योजना मात्र शुन्य आहेत
तालुक्यातील बोडखा येथील सिद्धार्थ कोकाटे यांच्या वडिलाचे ८ महिण्यापुर्वी मुत्यू झाला तर सिद्धार्थ कोकाटे यांचे किडनी आजार झाल्याचे वैधकिय चाचणीत स्पष्ट झाल्याने भुमिहिन असलेल्या व मोल मजुरी करुन कोकाटे कुटुंबानी खाजगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात खर्च केला मात्र प्रकृतीत सुधारणा न होत खालवत गेली शेवटच्या घटका मोजणाऱ्या परिस्थिती पुढे हतबल होत सिद्धार्थ च्या कुटुंबांनी शासकीय रुग्णालयात पैसे अभावी त्यांचा उपचार सुरू होता. मात्र त्यांचा डायलेसिस उपचार दरम्यान मुत्यू झाल्याने सिद्धार्थ हा घरातील कर्ता पुरुष असल्याने किडनी आजारावर मोल मजुरी नातेवाईक व इतरा कडून उसनवार करुन किडनी आजारावर खर्च करुन कवडीचा फायदा झाला नाही उलट कर्ज बाजारी झाल्याने समाजातील दानशुर व्यक्तीने ४ वर्षाची मुलगी , पत्नी , म्हातारी आई यांना व शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे अशी मांगणी बोडखा ग्रामस्था कडून होत आहे