अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक
खामगाव – बुलडाणा आगारातून परतवाड्याकडे निघालेल्या बसचे अचानक बोथा घाटात ब्रेक फेल झाल्याची घटना आज दि.२७ जानेवारी रोजी दुपारी घडली.
येथे क्लिक करून पहा
https://www.suryamarathinews.com/post/8498
यावेळी चालकाने दाखविलेल्या समयसुचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व बसमधील ४० प्रवाशांचे थोडक्यात प्राण बचावले. चालकाच्या या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांनी त्यांचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा परिवहन मंडळाची बस क्रमांक एमएच ०६ – ८२३३ ही बस प्रवाशांना घेवून बोथा घाटमार्गे परतवाड्याकडे दुपारी निघाली होती.
दरम्यान घाटात पोहचताच बसचे ब्रेक अचानक फेल झाल्यामुळे प्रवाशी आणि चालकाची धांदली उडाली.
यावेळी बसमध्ये बसलेल्या ४० प्रवाशांचे प्राण वाचविण्याकरीता बसचालक एस.एस.खिल्लारे यांनी समयसुचकता दाखवत बसला दरी मध्ये जाण्यापासून वाचवत सरळ बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडला घासत बसला थांबविले.
बस थांबताच प्रवाशांनी तातडीने बाहेर पडत आपला जीव वाचविला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशी आणि चालक वाहक घाबरून गेले होते.
बस थांबताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. या प्रकारामुळे मोठी जीवित हानी होता होता टळली. तर पुन्हा एकदा परिवहन मंडळाच्या भंगार बसेसचा प्रश्न एवी अशी मागणी प्रवाशांकडून यावेळी करण्यात आली.