बर्ड फ्लू च्या धास्तीने चिकन ऐवजी ग्राहकाची मासे व बोकडाला पसंदी !

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यातील भानखेड येथील वीस कोंबड्यांचा मृत्यू झाला होता व त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्या नंबर बर्ड फ्ल्यूमुळे त्या मृत्युमुखी पडलेल्या होत्या !त्यामुळे चिकन खाणाऱ्या मंडळीचा पुरता हिरमोड झाला आहे :चिकन खाणारे ग्राहक हे आता मासे व बोकडाच्या मटणाच्या कडे वळले आहे .हे चित्र सध्या दिसत आहे ! सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या साखरखेर्डा येथील मटन बाजारामध्ये मंगळवारी बोकड्याचे मटन व मासोळी घेण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी झाली होती !व चिकन घेणाऱ्यांची संख्या ही तुरळक होती !त्यामुळे बर्ड फ्लू च्या धास्तीने चिकन खाणारे खवय्ये दुसरीकडे वळण्याची दिसते !त्यातच करून मुळे वर्षभर सर्वच दुकाने बंद असल्यामुळे अनेक लोकांचा हिरमोड झाला होता!काही का असेना खवय्ये बोकड व मासोळी घेण्यासाठी मटण मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहे हे मात्र खरे !

Leave a Comment