फागुन मास निमित्त श्री सांवरे के बावरे भजन परिवार शेगावच्या वतीने भव्य निशान यात्रा संपन्न.

 

इस्माईलशेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव ते खामगाव मार्गावर निशाण यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
निशान यात्रेत 18 किलोमीटर चालत शामिल झालेल्या स्वानाने सर्वांचे लक्ष वेधले..

 

शेगाव: स्थानिक प्राचीन हनुमान मंदिर परिसरातून श्री सांवरे के बावरे भजन परिवार शेगावच्या वतीने आज पाच मार्च रोजी पहाटे पाच वाजता शेगाव ते खामगाव पर्यंत निशाण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते ,खाटू वाले श्याम बाबा भक्तांसाठी धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या भारतीय तिथी फागुन मास मध्ये हारे का सहारा श्याम बाबा हमारा श्याम बाबा की जय असा जयघोष करीत शेकडो च्या संख्येने भक्त परिवार आज पहाटे खामगाव साठी रवाना झाला प्राचीन हनुमान मंदिर येथून प्रारंभ.

झालेली निशान यात्रा गांधी चौक मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराजा अग्रेशन चौक रेल्वे स्टेशन समोरून सार्वजनिक बांधकाम विभाग च्या विश्राम भवन, एम एस ई बी चौक, जगदंबा चौक श्री गजानन वाटिका चौक या मार्गाने श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय समोरून ही निशाण यात्रा खामगाव रोडने जवाहर नवोदय विद्यालय सवर्णा फाटा, चिंचोली कनारखेड टाकळी विरो या मार्गाने चालत श्याम बाबा चा जयघोष करीत ही निशाण यात्रा लासुरा फाट्यावर पोहोचताच.

त्या.ठीकाणी गोविंद व्यास व मित्र परिवारातर्फे या निशान यात्रेतील सर्व भाविकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या स्वागताचा स्वीकार करून ही निशाण यात्रा जयपुर लांडे सिद्धिविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरून वरखेड या मार्गाने खामगाव शहरात पोहोचली रजत नगरी असलेल्या खामगाव शहरातील फरशी भागांमध्ये डिडवानिया सुपर बाजार संचालका तर्फे या निशाण यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी संपूर्ण परिसर हा खाटू श्याम वाले की जय, हारे का सहारा श्याम बाबा हमारा. अशा गगनभेदी घोषणांनी दणाणून गेलेला दिसत होता फरशी भागातून ही निशाण यात्रा खामगावात असलेल्या खाटू श्याम मंदिरात पोहोचली व त्या ठिकाणी निशान यात्रा मधील सर्व भाविकांनी मंदिरात निशान ध्वज अर्पण केले या निशाण यात्रेमध्ये युवक युवती महिला पुरुष व बालक वर्ग उत्साहात सहभागी झालेले होते. संत नगरी शेगाव येथून सुरू झालेल्या या निशान यात्रेमध्ये एक स्वान सहभागी झालेला होता निशान यात्रा प्रारंभ होऊन 18 किलोमीटर पैदल चालून समारोप होईपर्यंत हा स्वान सुद्धा सहभागी झालेला होता त्यामुळे तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता..

Leave a Comment