प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने लातूरच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादक मो.9921400542
दिनाक 8 मे अमरावती

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन यथोचित सन्मान केला व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त १०० सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारांच्या कुटुंबियांना शैक्षणिक व आरोग्य सुविधा पुरविणार असून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्थामध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक पंडीत हणमंते, संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, लातूर जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, लातूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संघटक संजय राजुळे तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, माढा तालुका अध्यक्ष कुंदन वजाळे, माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धनाथ सावंत, करमाळा तालुका सचिव हर्षवर्धन गाडे, रमेश हणमंते, उत्तम फड, उषाताई भालेराव, प्रतिक्षा पिटले, आबासाहेब झिंजारे, सुरज मद्देवाद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लहुकुमार शिंदे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा कार्याकरिणीने केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उलगडा केला. राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांनी माझ्या माहेरच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर येथे सासरी येऊन सन्मान केला. हा सन्मान मी विसरू शकणार नाही असे प्रतिपादन केले. दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक पंडित हणमंते यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट कार्य करीत असून संघटनेच्या सर्व बातम्या दैनिक साहित्य सम्राटमधून कायम प्रसिद्ध करणार असल्याचा विश्वास दिला. सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांनी सोलापूर जिल्ह्यात अनेक महिला पत्रकार संघटनेत येण्यास इच्छुक असून वर्षभर विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. तर लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून आम्ही पत्रकारांच्या कल्याणार्थ कायम लढणार असल्याचे सांगून उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर व सोलापूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment