प्रा. डाॅ.राजु निखाडे रा.से.यो.उत्कृष्ट कार्यक्रम अधीकारी पुरस्काराने सन्मानीत

हिंगणघाट:-मलक मो नईम

स्थानिक रा.सु.बिडकर महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. राजु निखाडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यपिठाने उत्कृष्ट एन एस एस अधीकारी या पुरस्काराने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डाॅ.सोपानदेव पिसे व प्र.कुलगुरु डाॅ.संजय दुधे यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. राजु निखाडे रा.सु.बिडकर महाविद्यालयात २०१६ पासुन रा.से.यो.चे कार्यक्रम अधीकारी म्हणुन कार्य करीत.
प्रा.डाॅ.राजु निखाडे हे रा.सु.बिडकर महाविद्यालयात समाजशास्र विभागप्रमुख असुन त्यांचे कडे २०१६ पासुन रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी म्हणुन काम पाहतात.त्यांच्या या कामाची दखल घेत विद्यापीठाने वर्धा जिल्हा विभागिय समन्वयक म्हणुन २०१९ पासुन नियुक्ती केली आहे. त्यांच्या या कार्यकाळात राष्ट्रिय सेवा योजना विशेष शिबिर वेळा, शेगाव कुंड, वणी, सातेफळ, पिंपळगाव, या ठिकनी घेतले. त्यात त्यांनी ग्रामस्वच्छता वृक्षारोपन, श्रमसंस्कार शिबीर, आरोग्य शिबिर, पशुशिबीर, रक्तदान, वेगवेगळ्या विषयातुन उदबोधन केले.यामळे प्रत्येक ग्रामपंचायतने त्यांच्या कामाची दखल घेत उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणुन त्याना प्रमाणीत केले.
प्रा.डाॅ.राजु निखाडे शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजीक कार्यातही जुळलेले आहेत.लोकसत्ता, पुन्यनगरी, सारख्या दैनिक वृत्तपत्राचे लेखनही केले आहे.संताजी नागरी पतसंस्थेचे संचालक, उपाध्यक्षही राहिलेले आहे.
तसेच नागपुर टिचर असोशिअनचे वर्धा जिल्हा उपाध्यक्षही होते. हिगंनघाट रोटरी क्लबचे२०२१-२२ चे उपाध्यक्ष होते २०२३-२४ चे प्रेसिडेंट ईलेक्ट आहे व फर २०२३ च्या रोटरी उत्सवाचे अध्यक्षपदही भुषवित आहे.
नागपुर विद्यापीठ परीक्षा मुल्यांकन माॅडरेशन पीएचडी. चे मार्गदर्शक असून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व सावित्रीबाई फुले विद्यापीठ जळगाव पीएचडी चे सुपरवायझर म्हणुनही कार्य केले. सध्या ते विद्यापीठाच्या समाजशास्र विषयाच्या टाक्सफोर्स समीतीचे सदस्य ही आहे. तसेच कोविडच्या काळात प्रा.राजु निखाडे यांनी रा.से.यो.च्या स्वंयमसेवकासोबत गरजुंना बिस्कीट वाटप फळांच्या कीट वाटप पाणी वाटप व गरजुंना दवाखाण्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले.तसेच बॅंके समोर झालेल्या गर्दीमधेही स्वयंमसेवकाना सोबत घेउन सोशल डिस्टेंसिंगचेही कामे केली.
रा.से.यो.च्या उत्कृष्ट कामाची दखल घेउन रा.सु.बिडकर महाविद्यालयालाही उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देण्यात आला.
आपल्या या पुरस्काराचे श्रेय संस्थेच्या अध्यक्षा मा.डाॅ. उषाताई थुटे व प्राचार्य डाॅ.भास्कर आंबटकर महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक रा.से.यो चे स्वयंसेवक रोटरीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.मुखी व सर्व सदस्य यांना दिले.

Leave a Comment