प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैजापूर येथे थाळी नाद आंदोलन..

0
298

 

वैजापूर दि २१(ऋषी जुंधारे)

केंद्र शासनाकडून शेतीसाठी उपयुक्त लागणाऱ्या खतांचे भाव गगनाला भिडले असून त्यातच केंद्र सरकरने देशात मुबलक कडधान्य असतानाही कडधान्य आयात केले आहे.आधीच देशातील शेतकरी कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असतानाच अनेक शेतकरी मरणाच्या दारात उभे असतांना शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळून देण्याऐवजी शेतकऱ्यांचे रक्त शोषण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याने राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या आदेशानुसार गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाकडून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध सामाजिक अंतर ठेवून थाळी नाद आंदोलन करण्यात आले.या दरम्यान वैजापूर तालुक्याचे प्रहारचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके व उपतालुका प्रमुख गणेश सावंत,विशाल शिंदे,सागर गुंड यांनी वैजापूर तहसीलदार यांना सकाळी निवेदन देऊन सायंकाळी तालुका भर कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील प्रमुख ठिकाणी केंद्र सरकार विरुद्ध शांततेत थाळी नाद आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here