प्रतिनिधी-सचिन पगारे
नांदगांव नाशिक
प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील सैन्यात नव्याने नियुक्त झालेल्या यूवकांचा जाहिर सत्कार करण्यात आला. येथील प्रहार संघटनेकडून या विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यात आला. गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच ग्रामपालिका येथे ही ध्वजारोहण करण्यात आले.तसेच या विशेष दिवसाचे औचित्य साधून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर येथे प्रहार संघटनेने सत्कार समारंभाचे आयोजन केले. या सत्कार समारंभासाठी नव्याने सैनिक म्हणून नियुक्त झालेले वैशाली वाल्मिक पवार व समर्थ विलास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.वैशाली पवार ही परिसरातील पहिली महिला सैनिक म्हणून ओळखली जात आहे. वैशाली पवार व समर्थ चव्हाण यांनी नुकतेच स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत यश मिळवले आहे. यांचे विशेष कौतुक करण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेकडून या समारंभाचे आयोजन करण्यात आले.या समारंभाचे सुत्रसंचालन संदीप पवार यांनी केले. प्रहार संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सुर्यवंशी यांनी या दोघांचा सत्कार केला तसेच देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.नारायण पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रहार संघटना अध्यक्ष जनार्दन भागवत, चंद्रभान झोडगे,वैभव शिंदे,गणेश पवार, राहूल पवार, दिपक पगारे, सचिन पगारे,वाल्मिक वर्पे,भरत पाटील,अशोक पगारे,वाल्मिक पवार, विलास चव्हाण,गणेश जूंधरे आदी उपस्थित होते.