धिरज नेवारे चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी
दलीत मागासवर्गीय नागरीक अतिक्रमित अतिरिक्त बांधकामाच्या मोबदल्यापासुन वंचित ठेवल्यामुळे घुईखेडवासी यांचे आमरण उपोषण
सविस्तर असे की 2009मध्ये तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी हेमंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली घुईखेड येथील नझुल घर व त्याला लागून असलेल्या अतिरिक्त अतिक्रमित बांधकाम केलेल्या नागरिकांची मागणी यादी 508अर्ज जिल्हाधिकारी अमरावती यांना प्राप्त झाले होते त्यापैकी 46+28+40=114 या अतिक्रमित व अतिरिक्त बांधकाम केलेल्या घुईखेड येथील नागरीकांना मोबदला देण्यात आलेला आहे. यामध्ये धनदांडग्यांनाच, राजकारणी लोकांना मोबदला देण्यात आलेला आहे असा आरोप बेंबळा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष अनिल वरघट यांनी केलेला आहे व आजही 12 वर्षानंतर ज्यांचे अतिरिक्त अतिक्रमित बांधकाम सुटलेले आहे अशा नागरिकांची यादी प्रकल्पातून गहाळ असुन पुन्हा 46+28+40 या यादीतील नागरिकांना 71 च्या यादीमध्ये स्थान देऊन त्यांना पुन्हा मोबदला देण्यात आला असून मुळ अतिरिक्त अतिक्रमणधारक त्या मोबदल्या पासुन आजही वंचित असल्यामुळे पुन्हा बेंबळा प्रकल्प अधिकार्यांनी अर्ज मागविले मुळे त्या कार्यालयाला 392 अर्ज प्राप्त झाले आहे त्यामध्ये अनेक नागरिकांनी पुन्हा पुन्हा अर्ज केल्यामुळे ज्या नागरीकांचे जे एम आर व्यतिरिक्त अतिक्रमित बांधकाम होते अशा नागरीकांची यादी तपासणी करून अपात्र लोकांना वगळून पात्र लोकाची समवेशक यादी बनवुन न्याय द्यावा अशी गावकऱ्यांची मागणी होती परंतु बेंबळा प्रकल्प अधिकारी व काही नागरीकांच्या संगनमताने बेंबळा प्रकल्पाच्या अधिकार्यांनवर दबाव टाकून याच गावातील 20 ते 30 नागरीकांची यादी त्याच्या मुल्यांकनासह सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यामुळे गावामध्ये प्रचंड असंतोष होऊन खळबळ उडाली त्यामुळे समस्त गावकरी हे बेंबळा प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आलेल्या 392 व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांचेकडे देण्यात आलेल्या(2009) मध्ये508 अर्ज व अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या अतिक्रमित बांधकामाचा मोबदला अजुन पर्यंत बेंबळा प्रकल्प यांच्या कार्यालयामार्फत देण्यात न आल्यामुळे या न्याय मागणीकरीता सोमवार दि 22 मार्च 2021 पासुन कार्यकारी अभियंता बेंबळा प्रकल्प विभाग यवतमाळ यांच्या दालनात अनिल वरघट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमूद आहे याबाबत चे निवेदन सर्व संबंधित विभागाला देण्यात आलेले आहे.