पोलीस भरतीच्या तयारी करिता गेलेल्या हिंगणघाट येथील मुलीचा संशयास्पद मृत्यू

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- नितू बंडूजी सावध (२५) रा. इंदिरा गांधी वॉर्ड हिंगणघाट जि. वर्धा ह.मु. यवतमाळ टिळकवाडी ती यवतमाळात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मैत्रिणींसोबत राहात होती. नितू 4 सप्टेंबर पासून बेपत्ता होती .घाटंजी मार्गावर असलेल्या सावरगड शिवारात एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. ही घटना मंगळवारी दि. रात्री ९.३० वाजता उघड झाली. ग्रामीण पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी शासकीय रुग्णालयात ठेवला. दरम्यान अवधूतवाडी पोलीस ठाण्यात २५ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची तक्रार नोंद होती. नितू यवतमाळात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मैत्रिणींसोबत राहात होती. नितू 4 सप्टेंबरला बेपत्ता झाली. याची माहिती मिळाल्यानंतर तिची आई शोभा सावध राहणार हिंगणघाट यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दिली. अवधूतवाडी पोलिसांनी नितूचा शोध सुरू केला. मात्र ती मिळाली नाही. अखेर मंगळवारी रात्री ९.३० वाजता तिचा मृतदेह हाती लागला.
ग्रामीण पोलिसांनी नितूचा मृतदेह शवचिकित्सेसाठी ठेवला आहे. शवचिकित्सा अहवाल प्राप्त झालेला नाही. तिचा मृत्यू नेमका कशाने झाला हे निश्चित झाले नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

शोभा सावध (आई) :- आरिफ अली नावाचा व्यक्ती एक वर्षापासून माझ्या मुलीला त्रास देत होता. माझ्या मुलीने मला सांगितलं होतं व दाखविल सुद्धा होत ,पोलीस भरती मध्ये लागण्याकरिता पोलीस रेकॉर्ड चांगला पाहिजे त्यामुळे दुर्लक्ष केल. माझ्या मुलीने सांगितले की माझ्या जीवाला काही धोका झाल्यास हा इसम माझ्या मृत्यूला जबाबदार राहील . माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे.

Leave a Comment