पोलिसांच्या पुढाकाराने आयोजित राेजगार मेळाव्याचा 1182 युवक-युवतींना लाभ

 

गोंदिया शैलेश राजनकर

गोंदिया,दि.20 : नक्षली चळवळीचा बिमोड करण्याच्या ध्येयाने गोंदिया पोलिसांनी अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा विडा उचलला आहे. विविध उपक्रमाच्या अंमलबजावणीतून आदिवासी युवकांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली जात आहे. ऐवढेच नव्हेतर आदिवासी युवक-युवतींमधील सुप्त गुणांना वाव ही देण्याचे काम गोंदिया पोलिसांकडून केले जात आहे. पुणे, मुंबई येथील कंपन्यांमध्ये आवश्यकतेनुसा दुर्गम भागातील आदिवासी युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.16 ते 18 फेबुवारी दरम्यान देवरी,नवेगावबांध व सालेकसा याठिकाणी हा रोजगारमेळावा आयोजित करण्यात आलेला होता.यात गृप आॅफ कंपनी पुणे,पटेल एज्युकेशन स्कील फाऊंडेशन नागपूर,इमर्ज वर्क फोर्स नागपूर,डेक्कन मॅनेजमेंट कंसल्टंट फिनीसींग स्कुल,पुणे आदी कंपनीचे प्रतिनिधीनी मुलाखत घेतल्या.या मेळाव्यात 1182 सुशीक्षित बेरोजगार युवक युवतींनी सहभाग नोंदविला.पोलीस अधिक्षक विश्व पानसरे व अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात हे आयोजन करण्यात आले होते.युवकांना रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.आयोजनासाकरीता देवरी,नवेगावबांध व सालेकसा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Comment