इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
पी एम किसान सन्मान निधी योजनेचे थकवलेले हप्ते बँक खात्यावर वितरीत करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. ७ ऑगस्ट रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद आहे की,
प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने प्रती शेतकरी २ हजार रुपये हप्ता देण्यात येतो. आणि वर्षाला ३ हप्ते असे एकुण प्रती शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये सरकारकडून वाटप करण्यात येत असल्याचा अनेक महिन्यांपासून सरकार मोठा वाजा गाजा करत आहे.
पंरतु हकिकत वेगळीच आहे. कित्येक महिन्यापासून पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजुन २ हजार रु. खात्यावर वितरीतचा मुहूर्तही झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी कार्यालयात चकरा घालून हैराण झाले आहेत, लोकप्रतिनिधींनी या योजनेच्या कागद पत्रासाठी कॅम्पचे उद्घाटन करुन मोकळे झाले आहेत.
शेतकऱ्यानी के वाय सी केल्या शिवाय पी एम किसान सन्मान निधी खात्यावर जमा होणार नाही असे प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडुन वेळोवेळी सांगण्यात येत आहे
. पंरतु गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांची के वाय सी झालेली असतांना शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता खात्यावर जमा होत नाही. अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. अगोदरच महापुराने ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वच बाजुचा आधार तुटल्याने पुर्णपणे शेतकरी खचुन गेला आहे.
करीता तत्काळ आपल्या स्तरावर पीएम किसान निधीचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करुन निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालया समोर सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे ,
यावेळी स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय ठाकरे, अजय ठाकरे,विशाल चोपडे, गोकुळ गावंडे, संजय धरमकार, प्रफुल करांगळे, राजेंद्र ठाकरे, रवी चोपडे, विठ्ठल जळमकार, मोहन चोपडे, सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..