अर्जुन कराळे शेगाव
खामगांव,दि-22(उमाका)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAAN) अंतर्गत दिनांक 27/06/2023 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता पासुन महात्मा गांधी सभा गृह तहसिल कार्यालय खामगांव येथे शिबीर आयोजीत करण्यात येत आहे. शिबीरामध्ये E-KYC करणे,
नविन नोंदणी करणे, नविन नोदंणी केलेल्या लाभार्थ्यांना मान्यता देणे, आधार कार्डानुसार नावात दुरुस्ती, ईत्यादी करिता शिबीर घेण्यात येणार आहे. तरी ज्या लाभार्थ्याना लाभ मिळण्याकरीता अडचणी येत आहेत त्यांनी आपले आधार कार्ड, संगणीकृत 7/12 8अ, बँक पासबुक, आधार कार्डाला लिंक असलेले मोबाईल क्रमांक चा मोबाईल व पती पत्नी दोघांचे आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे.
तरी याव्दारे खामगांव तालुक्यातील पी एम किसान योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या व ज्यांना काही हप्ते मिळुन व नंतर लाभ बंद झालेल्या व नोंदणी करुनही लाभ सुरू न झालेल्या
खातेदारांच्या अडचणी असल्यास (PM KISAAN) पोर्टलवरुन सदयास्थितील स्टेटस आपल्या जवळील सेतु केंद्र, (CSC) आपले सरकार केद्रां मधुन झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन यावे याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे अतुल पाटोळे तहसिलदार खामगांव यांनी कळविले आहे.