पिक कर्ज न मिळाल्याने केली आत्महत्या..

 

आयुषी दुबे शेगाव

 

महिला शेतकरयांची रेल्वेखाली आत्महत्या..

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव शहरात राहनारी 49 वर्षीय महिला शेतकरी ने पिक कर्ज मिळत नसल्याने वैतागुन रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे …
शेगाव येथील पंचशिलनगर येथे राहत असलेल्या श्रीमती सरला भिकाजी कोकाटे यांच्यकडे 3 एकर कोरडवाहू शेत जमीन आहे मागील काही वर्षापासून शेत नैसर्गिक आपत्ति मुळे पिकत नसल्याने चिंताग्रस्त होत्या अश्यातच यावर्षी सोयाबीन पूर्ण नष्ट झाले घरात खायला सुद्धा पैसे नसल्याने श्रीमती सरला कोकाटे तनावात राहत होत्या पिक कर्ज साठी स्टेट बैंकेत अर्ज केला होता 5 पहिन्यापासुन बाँकेच्या चकरा मारून थकल्या होत्या पिक कर्ज मंजूर झालेच नाही त्याच विवेन्चनात नैराश्यपोटी श्रीमती सरला कोकाटे यानी शेगाव रेलवे स्थानका नजिक रेल्वेखाली आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविली ….
लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतक महिलेची ओळख पटविली असून मृतक महिला श्रीमती सरला कोकाटे असून शव विच्छेदना साठी रुग्णालयात पाठविले आहे या घटनेत मर्ग दाखल केला आहे

 

Leave a Comment