पिंपळगाव पेठ चा पाझर तलावाचे काम बेकायदेशीर असल्याची तक्रार बांधकाम कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याचे जन मंगल संघाची मागणी.

 

सागर जैवाळ

सिल्लोड तालुका प्रतिनिधी

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील वादात सापडलेल्या पाझर तलावाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी जन मंगल संघाच्या वतीने करण्यात आली आहे पिंपळगाव पेठ येथे मे 2020 मध्ये बांधण्यात आलेल्या पाझर तलावात बारा बलुतेदारांच्या स्मशानभूमीचे उत्खनन करण्यात आले असून कोणालाही विश्वासात न घेता सर्व केले असून धनगर समाजाची स्मशानभूमी पाझर तलावा च्या पाळूत दाखवण्यात आली आहे 25 शेतकऱ्यांच्या रस्ता पाण्याखाली गेला आहे तर दोन सरकारी सिमेंट बंधारे पाण्याखाली गेली असून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई केली जात नाही व सर्व प्रश्न निकाली काढले जात नाही तोपर्यंत संबंधित पाझर तलावाचे बिल अदा करण्यात येऊ नये तसेच बांधकाम कंपनीला ब्लॅक लिस्ट करावी अशी मागणी जन मंगल संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राहुल कुमार ताठेयांनी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार. जिल्हाधिकारी, लघुसिंचन जल व मृदा औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.

Leave a Comment