आयुषी दुबे (कार्यकारी संपादिका)
संग्रामपुर उन्हाळा आला तेव्हा पक्षासाठी पाण्याची सोय करावी असे प्रत्येक जण सांगतो मात्र यातच टाकाऊ वस्तु पासून उपयोगी साहित्य कोणीही बनवत नाही परंतु मलकापूर पांग्रा येथील कै विजय मखमले उर्दू माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत शिक्षक शेख इमरान यांनी टाकाऊ वस्तु पासून पक्षासाठी पाणवठे तयार केले आहेत. हे पाणवठे सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. उन्हाळा लागला की कित्येक पशु पक्षी यांच्या पोस्टवर संदेश सोशल मीडियावर फिरताना दिसतात मात्र त्यातील किती लोक या संदेश पासून सज्ञान होऊन पाखरांना पाणी आणि अन्नाची सोय करतात हा प्रश्नच आहे. मात्र कित्येकांची इच्छा असून सुद्धा ते उपायोजना करू शकत नाही कारण पाणी ठेवण्यासाठी मातीचे भांडे आणायची कुठून खर्च करणार कोण अशातच इच्छा असून सुद्धा नाईलाज असतो मात्र शिक्षक शेख इम्रान यांनी टाकाऊपासून उपयोगी असे पर्यावरण पूरक पाणवठे तयार केले आहे हे पाणवठे त्यांनी आपले मित्र शिक्षक किरण कायंदे व विजय इंगळे यांच्या मदतीने माळरानावर झाडाला लटकवले आहे .पाणवठे बनवण्याची कृती त्यांनी फेसबुक वरती शेअर केली त्याला खूप लोकांची पसंती मिळत आहे त्यातून खूप लोकांना प्रेरणा सुद्धा मिळत आहे ही उपायोजना सोशल मीडियावर गाजत आहे यापासून इतर लोकसुद्धा प्रेरणा घेत आहे श्रीमंतच नव्हे तर गोरगरीब होतकरू ज्याच्याकडे टाकाऊ असे प्लॅस्टिकचे सामान पडलेले आहे त्यांच्यासाठी या शिक्षकांनी केलेला उपक्रम खूप प्रेरणादायी आहे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे अशातच लॉकडॉउन ची परिस्थिती असल्या कारणाने बहुतांश शाळा विद्यालय बंद आहेत त्यातच विद्यार्थ्यांना घरी कार्यानुभव म्हणून सुद्धा टाकाऊ पासून उपयोगी असे साहित्य बनवून भूतदया घडू शकते.
*बॉक्स*
घराच्या गॅलरीत व माळ रानावरती केली सोय
प्रत्येक घरात खायच्या तेलाच्या रिकामे फुटकी कॅन ; प्लास्टिकचे टोपले तार; दोरी असे साहित्य पडलेले असते त्याला एक दीड लिटर पाणी बसेल याप्रमाणे आडवे कापून खिळ्याच्या साह्याने छिद्र करून तारा च्या साह्याने पक्ष्यांना बसण्यासाठी जागा बनवली घराच्या गॅलरीत आणि माळरानावरती झाडावर लटकवण्यासाठी त्याला उपाय योजना केली.मागील वर्षी सुद्धा त्यांनी उपक्रम राबविला होता हे विशेष.