पळशी वैद्य येथिल बलात्कार आरोपीस कठोर शिक्षेची मागणी संदर्भात मुख्यमंत्री यांना काँग्रेसचे निवेदन

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

बुलढाणा जिल्ह्य़ातील जळगाव जामोद तालुक्यातील पळशी घाट (वैद्य) येथे एका सहावर्षिय आदिवासी मुलीवर एका नराधमाने पाशवी बलात्कार केला. आज बुलढाणा जिल्हाव महिला कॉंग्रेस च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावे निवेदन दिले आणि या निवेदनात या गुन्हेगारास ताबडतोब कठोर शिक्षा होण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात प्रविष्ट करण्यात यावी व ताबडतोब पिडीतेला व तिच्या कुटुंबातील लोकांना लवकर न्याय मिळावा यासाठी निवेदनात मागणी केली आहे. यावेळी उपस्थितीत बुलढाणा जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ ज्योती ताई ढोकणे, जळगाव जामोद शहर अध्यक्षा सौ मिनाताई सातव,, विधानसभा पक्ष नेत्या सौ स्वाती ताई वाकेकर, बुलढाणा जिल्हा महिला कॉंग्रेस उपाध्यक्षा सौ परविनताई देशमुख, सौ सुषमाताई भिमराव पाटील, सौ केदार ताई सौ संगीता बारेला, सौ निता पवार, बुलढाणा जिल्हा महिला कॉंग्रेस च्या सरचिटणीस सौ ज्योती वानेरे, युवा कॉंग्रेस कार्यकर्ते अ.राजिक,शेख मंजूर, शे जुनेद शेख,मतिन पटेल , शेख शफिक, अनिल भाऊ शंकर ईंगळे, श्री श्रीकृष्ण केदार सेवादल सरचिटणीस विधानसभा जळगाव जामोद श्रेत्र साक्षी गायकी, मंजूराताई इंगळे सदस्या तालुका कॉग्रेस कमिटी, दिव्या झांबरे, निकिता ईंगळे, शुभांगी वानखडे, गोकरणा झांबरे गोपाल करांगळे, नितीन भाऊ जाधव, ज्ञानेश्वर वानखडे, सुनील भाऊ येनकर, ज्ञानदेव गायकी श्रीयुत लहासे सर यांची उपस्थिती होती

Leave a Comment