पलढग धरणाच्या जलाशयात दोन इंजिन बोटींचे उद्घाटन

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा दि. 27 : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 26 जानेवारी रोजी ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाच्या जलाशयामध्ये दोन इंजिन बोटींचे केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. पर्यटन विकास योजने अंतर्गत ज्ञानगंगा अभयारण्याच्या सर्वागीण विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामधून मौजे तारापूर जवळील पलढग धरणाच्या क्षेत्रामध्ये वनपर्यटकांसाठी 52 लक्ष रु.च्या दोन इंजिन बोटीचे उदघाटन करण्यात आले. तसेच वन-पर्यटकांसाठी महिला बचत गट अंतर्गत उपहारगृहाचेसुध्दा उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रातील बांधवांशी संवादही साधला. कार्यक्रमासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती चे मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी, ज्ञानगंगा अभयारण्य प्रकल्पाचे डि.सी.एफ. श्री. खैरनार, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, तारापूर चे संरपच प्रविण जाधव, योगेश जाधव, डॉ. गोपाल डिके, राहूल सोळंके, प्रविण निमकरडे, बाळु जाधव आदींसह वनपरिक्षेत्र अभयारण्यचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment