पत्रकार सन्मान योजना व द्विवार्शिक वृत्तपत्र पडताळणी च्या अटी शर्ती शिथिल करण्यात याव्यात

 

अकोला जिल्हा पत्रकार संघाची मागणी

योगेश नागोलकार

राहेर- शासनाने ज्येष्ठ पत्रकारा साठी सुरु केलेल्या बाळ शास्त्रि जान्भेकर पत्रकार सन्मान योजने चा लाभ व्यापक स्वरुपात पत्रकाराना मिळवून देन्याकरिता शासनाने या योजने च्या जाचक् अटीं रद्द कराव्या तसेंच द्विवार्शिक व्रुत्तपत्र पडताळनि मधील शासनाने दिलेल्या अटीं शिथिल कराव्यात याव्या अशी मागणी अकोला जिल्हा पत्रकार संघा ने शासनाला केली आहे , अकोला जिल्हा पत्रकार संघा च्या कार्याकारि मंडळा ची सभा पत्रकार भवन मध्ये अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब यांच्या अध्यक्षते खाली , मराठी पत्रकार परिषदेचे मा अध्यक्ष सिद्धार्थ् शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्पन्न् झाली या सभेत पत्रकार सन्मान योजना ,पेन्शन योजना, व्रुत्तपत्रान्चि द्विवार्शिक पडताळनि मधील जाचक अटीं वर चर्चा करण्यात आली , कोरोना संकटा मुळे मागील 2 वर्षांपासून सर्वच दैनिक ,साप्ताहिक व्रुत्तपत्रे आर्थिक दृष्टया अडचणीत आलेली असून अशा परिस्थितीत शासनाने व्रुत्तपत्राना जाहिरातिच्या माध्यमातून विशेष आर्थिक पॅकेज घोषित करावे अशी मागणी या वेळी करण्यात आली , तसेंच द्विवार्शिक् वृत्तपत्र पडताळनि मध्ये देण्यात आलेल्या जाचक् अटीं शासनाने शिथिल कराव्या अशी मागणी शासनाला करण्यात आली , जिल्हा पत्रकार संघा ची वार्शिक् आम सभा व पत्रकार पुरस्कार वितरण या संदर्भात या सभेत चर्चा करण्यात आली, लवकरच् हे दोन्ही कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे सिद्धार्थ शर्मा यांनी या सभेत घोषित केले , शासनाने व्रुत्तपत्र व पत्रकाराच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित घर घर तिरंगा अभियानात् सर्व पत्रकारानि सहभागि व्हावे असे आवाहन् यावेळी करण्यात आले , जिल्हा पत्रकार संघा चे सरचिटणीस् प्रमोद लाजुरकर यांनी उपस्थित पत्रकारानचे स्वागत केले , सभेचे संचालन चिटणीस संजय खाडेकर यांनी केले , जिल्हा पत्रकार संघा चे उपाध्यक्ष रामदास वानखडे,गजानन सोमानि, प्रा मधू जाधव, राजू उखलकर्, रामविलास शुक्ला, मिलिन्द गायकवाद,अविनाश राऊत,ऍड शरद गांधी, कमलकिशोर शर्मा, मुकुंद देशमुख, समाधान खरात,नंदू सोपले, वंदना शिंगने, एड नीलिमा शिंगने, संगीता इंगळे, उमेश देशमुख , प्रदीप काळपांडे, मोहन जोशी, अब्दुल कुद्दुस, प्रा प्रवीण ढोणे , शाहबाज् देशमुख, दीपक रौन्दले, विलास खंदारे, अजय जागिरदार, गजानन् देशमुख, जयप्रकाश रावत , निलेश जवकार्, प्रल्हाद् ढोकने, सत्यशिल् सावरकर्, विठ्ठलराव् देशमुख, साहेबराव् गवई , मंगेश लोनकर्,विमल जैन, गिरनार् हागे,आदी सह जिल्ह्यातिल पाच हि तालुक्यातिल् पत्रकार , पदाधिकारि या सभेत उपस्थित होते, आभार प्रदर्शन संजय खाडेकर यांनी केले असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश जवकार यांनी कळविले.

*बॉक्स*

शासनाने अधिस्वीकृती साठी नियुक्त केलेल्या अधिकारी यांच्या समिती मध्ये पत्रकार सदस्यांचा समावेश करावा अशी मागणी अकोला जिल्हा पत्रकार संघा ने केली आहे , या संदर्भात मराठी पत्रकार परिषदेचे नेते एस एम देशमुख यांनी सुचविलेल्या प्रस्तावा ला अकोला जिल्हा पत्रकार संघा ने पूर्ण समर्थन दिले आहे.

Leave a Comment