संग्रामपूर शहरातील पत्रकार दयालसिंग गुरुचरणसिंग चव्हाण यांनी दि.10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसात परतवाडा येथील 3 जणांवर विरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.
सविस्तर माहिती अशी की,संग्रामपूर शहरातील पत्रकार दयालसिंग गुरुचणसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी वरून परतवाडा येथील बिजलसिंग उदयसिंग बावरी , धरमसिंग जयसिंग बावरी व नानकसिंग उदयसिंग बावरी यांनी सोशल मेडीयावर फिर्यादी यांचे विषयी तसेच त्यांचा भाऊ लखनसिंग चव्हाण आणि त्याच्या कुटुंबीया विरुध्द बदनामी कारक पोष्ट टाकुन व्हॉटसप व्दारे आमची समाजात बदनामी केली. तसेच वेगवेगळ्या स्वरुपाचे व्हाईस रेकॉर्डींग आणि फोटो टाकून बदनामी करणारे पोष्ट मेसेज व्हायरल केले.
ह्यावरुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तामगाव पो. स्टे.मध्ये दिल्यावरून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.
संग्रामपूर शहरातील पत्रकार फिर्यादी पत्रकार दयालसिंग गुरुचरणसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तिन्ही आरोपी विरुद्ध कायदेशीर कार्यवाही होणे करीता वि. न्यायदंडाधिकारी संग्रामपूर यांच्या न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करून न्यायालयात न्याय मागितला असुन सदर प्रकरण किरकोळ फौजरी अर्जानुसार अप.क्र. 158/2023 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
आहे. तसेच सदर प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठांनी सुध्दा योग्य चौकशी करुन फिर्यादीस न्याय मिळावा.अशी मागणी फिर्यादीने संबधीत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली आहे. फिर्यादी हा एका चँनल आणि वृत्तपत्राचा पत्रकार असल्यामुळे त्यास पत्रकार संरक्षण अधिनियमानुसार संरक्षण मिळण्याची मागणी सुध्दा समस्त पत्रकार बांधवांनी केली आहे.
फिर्यादी पत्रकार यांचे वहीणीला संबधीत आरोपी पैकी बिजलसिंग बावरी याने मोबाईलवर तुझा पतीला मारून टाकू आणि रात्री घर पेटवून देऊ .तसेच तुझ्या पत्रकार दिराला सुद्धा जिवे मारण्याचे दिलेल्या धमकी वरुन सुध्दा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.