मलकापूर : पतीसोबत घरगुती कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून एकता नगर येथील विवाहिता लहान बाळाला सोबत न घेता घर सोडून निघून गेल्याची घटना शनिवार दि.2 जाने रोजी घडली. मलकापूर शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून विवाहितेचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील बेपत्ता विवाहितेचे वडील विनायक विश्वनाथ वाघमारे यांनी दि. 7 जाने. रोजी, दिलेल्या फिर्यादीवरून त्याची मुलगी मयुरी भीमराज इंगळे वय 25 वर्षे हिचे शहरातील भीमराज इंगळे यांच्या सोबत सन 2019 मध्ये लग्न झाले होते. परंतु लग्ना नंतर दोघीणमध्ये नेहमीच छोट्या मोट्या कारणा वरून वाद होत असत त्या मुळे मयुरी ही आपल्या वडिलांच्या घरी राहावयास आली होती. दिनांक 2 जाने रोजी पती भीमराज इंगळे यांच्या सोबत 3 वाजेच्या दरम्यान फोन वरून झालेल्या वादामुळे मयुरी रागाच्या भरात आपल्या बाळाला सोबत न घेता घर सोडून निघून गेली. ती अद्याप पावेतो आलेली नाही अशी तक्रार दिली या वरून शहर पोलीस स्टेशन तर्फे मिसिंग क्रमांक 01/2021 प्रमाणे मिसिंग नोंद करीत सादर महिलेचा शोध सुरू केला आहे.
सदर महिलेचे वर्णन, रंग गोरा, सळपातळ बांधा, उंची 5.5 इंच, पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, व त्यावर लाल रंगाचे स्वेटर, कपाळावर डाव्या बाजूला तीळ असे नमूद असून सदर महिलेचा शोध सुरू आहे