गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद शहरातील भाजी मार्केटमध्ये 62 वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली.
टेलसिंग तारासिंग चव्हाण (रा. फुकटपुरा, जळगाव जामोद) असे फाशी घेणार्याचे नाव आहे. पगडीच्या साहाय्याने फाशी घेऊन त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवला. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. अधिक तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भारत बर्डे, हेड कॉन्स्टेबल कुसुंबे, पो. काँ. पवार, पो. काँ. निंबाळकर करत आहेत.