नीम हकीमांनो,गोद्री कुंभमुळे पोहरादेवीचे पावित्र्य आणि महत्व कसे काय कमी होणार आहे? – फुलसिंग जाधव,औरंगाबाद

 

 

प्रतिनिधी:(जालना)-जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री या गावी जानेवारी २०२३ मध्ये पार पडणाऱ्या हिंदू गोर बंजारा व लभाना नायकडा समाजाच्या ऐतिहासिक कुंभची जोरदार तयारी चालू आहे.केवळ देशातीलच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या गोर बंजारा बांधवांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

हजारो कार्यकर्ते विविध प्रकारे स्वतःहुन या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करीत आहेत.कार्यक्रमाला समाजातून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा पाहून अनेकांच्या पोटात पोटसुळ उठलेले आहे.लभाना समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता गोर बंजारा समाजातील सर्व अंतर्गत जातींना एकत्र जोडून समाजाला एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न स्वतःला विद्वान समजणाऱ्या लोकांना सहन न होणे अनाकलनीय आहे.दुःख एक लभाना कार्यकर्ता नेतृत्व करतो म्हणून आहे की,समाज एकत्र येतो आहे याचे आहे ?

आपल्या समाजातील नीम हकीम पुरोगामी डुकरांचा समाजात होणाऱ्या अशा विविध धार्मिक कार्याला नेहमीच विरोध राहत आलेला आहे.विशेष म्हणजे त्यांच्या अपप्रचाराला समाज कधीही बळी पडलेला नाही.

कारण समाजाला माहित आहे की,डुकरांचा स्वभावच असतो की, कुठेही घाण करणे.आजवर या डुकरांनी समाजात घाण करण्यापलिकडे काय केले आहे ?

संत श्री रामरावजी बापू यांच्या लक्षचंडी यज्ञाला याच डुकारांनी जातीबाहेरील लोकांना सोबत घेऊन संत श्री.रामरावजी बापूजींची आणि पोहरादेवीची नको ती बदनामी केली होती.

तरीही लक्षचंडी यज्ञ व्यवस्थित पार पडले.भक्तिधामला विरोध करणारेही हेच बेंदाड निवासी होते. इतर समाजामध्ये आपल्या समाजाची अप्रतिष्ठा करणे हा एकमेव कार्यक्रम हे नासके कांदे सतत राबवित असतात. जे की समाजासाठी खुप घातक आहे.

ही डुकरं समाजातील साधुसंताना तांड्याची औलाद नाही म्हणतात, ऐतखाऊ म्हणतात. पण हे ज्यांच्या पायावर डोके टेकतात ते भंते कुठे नांगरणी करुन पोट भरतात हे मात्र सांगत नाहीत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांना दुषित करुन जाती धर्मात तेढ निर्माण करणे आणि स्वतःला फार मोठे विद्वान असल्याचे साबित करण्यापलिकडे या बेंदाड निवास्यांचे दुसरा कोणताही उद्देश राहिलेला नाही. यांचा आजवरचा इतिहास तपासून पहा. समाज नासवणे यापलिकडे दुसरे कांहीही दिसणार नाही.समाजात कांही चुकीचे घडत असेल तर एकत्र बसून चर्चेतून मार्ग निघू शकतो.पण हे नीम हकीम पुरोगामी कधीच चर्चा करण्याची भाषा करीत नाहीत

लक्षचंडीच्यावेळी आणि आता गोद्री कुंभच्यावेळी आयोजकांशी आपण चर्चा करु असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेऊन सुद्धा त्यांनी चर्चेची तयारी दाखविली नाही.यावरुन त्यांची नियत किती दुषित आहे हे स्पष्ट होते.आता तर वेळ निघुन गेलेली आहे.आता कोणीही कितीही भुंकले तरीही त्यांना भीक घातली जाणार नाही.

या नीम हकीम पुरोगामीचे पाहुन काँग्रेसचे नालीतील कांही जीवजंतूसुद्धा बाहेर येऊन वळवळू लागलेले आहेत. कधी नव्हे एवढ्या प्रचंड संख्येने एकत्र येणाऱ्या समाजाला वेगवेगळी घाणेरडी कारणं पुढे करुन एकत्र न येऊ देण्याचा त्यांचा हा समाजद्रोही उद्देश स्पष्ट दिसतो आहे.या सर्व गांडुळानी एक लक्षात घ्यावे की, तुम्हाला विचारुन समाज जेवत नाही किंवा झोपत नाही.

याचेही त्यांनी भान ठेवावे.या गांडुळाना खुले आव्हान आहे की,तुमच्यात दम असेल तर जास्त नाही देशातील हजार दोन हजार लोकांना गोळा करुन तर दाखवा !

आरएसएसच्या मदतीने समाजाचे चार दोन प्रश्न सुटले तर तुमच्यावर आभाळ कोसळणार आहे काय ? आणि किती दिवस हे नको , ते नको करीत बसायचे. समाजाच्या भल्यासाठी कुठे ना कुठे तडजोड करण्यात चुक काय आहे ?

नेहमीच ताठर आणि टोकाची भूमिका घेत राहिल्याने समाजाचे प्रश्न कसे सुटतील ? याचा विचार नको का करायला,नीम हकीम पुरोगामी आणि काँग्रेसचे जीवजंतूची खरी पोटदुखी दुसरी तीसरी कांहीही नसून एक सामान्य आमचा लभाना बांधव देशभरातील सर्व गोर बंजारा समाजाला एकत्र करतो आहे.

हेच त्यांना सहन होत नाही.समाजाचे कांही प्रश्न या कुंभद्वारे सुटले तर उद्या त्यांना समाज विचारणार नाही याची भिती त्यांना सतावते आहे. म्हणून पोहरादेवी आडून ते त्यांच्या दुखऱ्या भागावर मलमपट्टी करुन घेण्याचा त्यांचा हा सर्व खटाटोप चाललेला आहे. यांना समाजाची , पोहरादेवीची एवढी काळजी असती तर धर्मांतरसंदर्भात यांची दातखिळी बसली नसती !

तोंड बंद करुन बसण्यासाठी त्यांना कोणाकडून पैसे मिळतात ? जर मिळत नसतील तर ते धर्मांतर प्रकारणाबाबत तोंड का उघडत नाहीत?संत श्री रामरावजी बापू यांचे उत्तराधिकारी श्री बाबुसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या ऐतिहासिक गोद्री कुंभमुळे पोहरादेवीचे पावित्र्य आणि महत्व कसे काय कमी होणार आहे ? संत रामराव बापूजींच्या निधनानंतर त्यांच्या गादीवर श्री बाबुसिंग महाराज यांची निवड सर्वसंमतीने झालेली आहे.

गोद्री येथे होणारे ऐतिहासिक कुंभ हे संत श्री रामरावजी बापू यांचे उत्तराधिकारी पीठाधीश्वर श्री बाबुसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.त्यामुळे हा पोहरादेवीचा आणि सर्व महाराज मंडळीचा सन्मान नाही का ? पोहरादेवीचा सन्मान संपूर्ण समाजाचा सन्मान होत नाही का ? पीठाधीश्वर श्री बाबुसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारे गोद्री कुंभमुळे पोहरादेवीचे पावित्र्य आणि महत्व कसे काय नष्ट होणार आहे ?

हा प्रश्न समाज नासवणाऱ्या प्रवृतीला समाजाने विचारला पाहिजे.समाजाला बदनाम करणाऱ्या या मनोरुग्णानी देश विदेशातून भाडोत्री आणून गोद्री कुंभची बदनामी जरी केली तरीही हा देशभर विखुरलेला समाज एकत्र येऊन आपल्या ऐतिहासिक संस्कृतीचे दर्शन आणि आनंद सोहळा जबरदस्त उत्साहात पार पाडणार आहे, यात कोणतीही शंका नाही. समाज सुज्ञ आहे .

दुष्प्रचार करणाऱ्या विकृत प्रवृतीला तो कोणत्याही परिस्थितीत बळी पडणार नाही हे तेवढेच सत्य आहे.पोहरादेवीचे कांही महाराज या कुंभ आयोजनाच्या प्रचार प्रक्रियेत दिसत नसतील तर त्याचे कारण आयोजक नसून त्यांच्या अंतर्गत असलेला पराकोटीचा वाद आहे. याप्रसंगी येथे त्याची चर्चा करणे उचित नाही.

गोद्री कुंभ कुठल्याही धार्मिक स्थळाचे महत्व कमी करणारे किंवा पावित्र्य नष्ट करणारे अथवा प्रती काशी उभारण्यासाठी नसून समाजाच्या सांस्कृतिक वारशाची जगाला ओळख करुन देण्यासाठी आणि बळजबरीने आणि लालुच दाखवून होणाऱ्या धर्मांतराबाबत समाजाला जागृत करण्यासाठी आहे.म्हणून समाजाने गोद्री कुंभ विरोधात भुंकणाऱ्यांकडे लक्ष न देता प्रचंड संख्येने एकत्र येऊन आपली ताकद दाखवणारच आहे.

हे तेवढेच सत्य आहे.आध्यत्म आणि व्यवहार यांची नेहमीच सांगड घालता येत नाही.म्हणून प्रसंगानुसार ज्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत लिहावे,बोलावे लागते.म्हणून याठिकाणी कांही अभद्र शब्द प्रयोग झालेले आहेत.त्याबद्दल क्षमस्व.

Leave a Comment