भंडारा – ज्योतिष विश्व विद्यापीठ, ओंकारेश्वर द्वारा संचलित ज्योतिष विद्यालय भंडारा च्या वतीने नि शुल्क कार्यशाळा नुकतेच जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती.
शिबीराची सुरवात प्राजक्ता संगीतराव यांनी सरस्वती स्तवन व नवग्रह स्तोत्र च्या पठणाने केली . कार्यक्रमाचे प्रमुख अतीथी म्हणून डॉ बबन मेश्राम ,डॉ वनिता शाह, डॉ मनीष खारा, डॉ देविदास बोधनकर, लोकेश मोहबंसी, नासिक त्रंबकेश्वर येथील उपाध्याय प्रमोद देवकुटे गुरूजी, मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक पराग भावसार, कबड्डीपटू आकाश पिकलमुंडे, ज्योतिष विद्यालय भंडारा चे संस्थापक अध्यक्ष डॉ हितेंद्र सोरटे उपस्थित होते. यावेळी मंचावर उपस्थित सर्व उपस्थितांचे स्वागत पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन करण्यात आले.
ज्योतिष विद्यालय भंडारा चे संस्थापक अध्यक्ष डॉ हितेंद्र सोरटे यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या विविध कार्याची माहिती देवून दैनंदिन जीवनात आपण ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र चा उपयोग करून आपले जीवन सुखकर करू शकतो असे मत व्यक्त केले.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित नि:शुल्क कार्यशाळेच्या आयोजन ज्योतिष विश्व विद्यापीठ ओंकारेश्वर चे संस्थापक गुरुवर्य डॉ भुपेश गाडगे सर यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनात करण्यात आले होते. तसेच प्रमुख वक्ते नासिक त्रंबकेश्वर येथिल उपाध्याय प्रमोद देवकुटे यांनी विशिष्ट तिथी,वार, नक्षत्रमुळे होणारे शुभाशुभ योग ज्याचा उपयोग रोजच्या जिवनात केल्यास अकस्मात येणारे आपदा कशा सहज दूर होऊ शकतात यावर मार्गदर्शन केले.तर पराग भवसागर यांनी सर्पयोग पुजनाचे धार्मिक आध्यात्म स्वताचे अनुभवावरुन सांगितले.यावेळी उपस्थित वक्तांनी वेगवगळ्या विषयावर मार्गदर्शन केलेत.
विद्यालयाच्या सदस्या सिमा नंदनवार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन अंकुश चुटे यांनी केले तसेच कार्यशाळेची सांगता प्राजक्ता संगीतराव यांनी पसायदानाने केली.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश करंडे, अंकुश चुटे, अजय संगीतराव ,प्रशांत खंडाळे,शैलेश साऊसाखरे, पवन हेडाऊ ,भारती जांबुळकर, मिनाक्षी ठवकर, प्राजक्ता संगीतराव,स्नेहलता बांगरे, अर्चना पंचबुद्धे ,विनोद उके, प्रफुल्ल नागापुरे, महेंद्र गभने, राहुल भानारकर,श्रद्धा डोंगरे, चित्रा झुरमुरे, डॉ माधुरी बोधनकर सह विद्यालयाचे सर्व सदस्यांनी अथक परीश्रम घेतले.