प्रतिनिधी अशोक भाकरे
शांघाय ता.२१: चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काळजीची परिस्थिती नाही, सर्वकाही नॉर्मल असल्याची माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी ‘एबीपी माझा’ला दिली.
डॉ. अचल श्रीखंडे चीनमधील वास्तविक परिस्थितीची माहिती देताना म्हणाले की, “चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे हे खरं आहे. परंतु त्यामुळे चिंताजनक स्थिती कुठेही नाही. आम्ही डॉक्टर खुश आहोत. आम्हाला किमान कोरोनाचे रुग्ण तपासता येत आहे. लोक खूष आहेत. त्यांना सततची सक्ती होती ती दूर झाली आहे.
जगभरात दाखवण्यात येतंय तशी काही परिस्थिती चीनमध्ये नाही. चीनमध्ये पसरणारा व्हेरियंट हा ओमिक्रॉन आहे. तो वेगाने पसरतो आहे, परंतु अतिशय माईल्ड आहे.
तीन दिवसांच्या उपचारानंतर सर्व वयोगटातील लोक बरे होत आहेत. केवळ दोन गोळ्या आम्ही देत आहोत.”
जगभरात दाखवलं जातंय तशी परिस्थिती चीनमध्ये आजिबात नसल्याचं सांगत डॉ. अखंड अचल म्हणाले की, चीनमधील क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.
ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत त्यांना सात दिवसांसाठी घरातच रहावं लागतं. झीरो कोविड पॉलिसी मागे घेतल्याने लोक रस्त्यांवर मोकळे फिरत आहेत, मॉल्समध्ये जात आहेत आणि आनंद घेत आहेत. कोणीही कशाही पद्धतीच्या चिंतेमध्ये नाहीत.
चीनमध्ये असलेला व्हेरियंट हा ओमिक्रॉन असल्याची माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी दिली. त्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेल्या डेल्टा व्हेरियंटमधून भारतीय नागरिक गेले आहेत.
त्यामुळे कोरोनाबद्दल चिंता करण्याचं कारण नसल्याचं ते म्हणाले. डॉ. अचल श्रीखंडे म्हणाले की, कोविडमुळे चीनमध्ये मृत्यूचं थैमान सुरू आहे अशा आशयाच्या बातम्या चुकीच्या आहेत. भारतीयांनीही त्याची काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सगळे डॉक्टर्स यासाठी तयार होतो, रुग्णालय तयार होती.
हा नॉर्मल फ्लू आहे. रुग्णाला व्हेंटिलेशनची गरज पडत नाही. त्यामुळे आम्ही याला अतिशय नॉर्मली ट्रीट करत आहोत. एक ते दोन दिवसांमध्ये रुग्ण घरी परत जातो आहे.
बहुसंख्य रुग्ण तर रुग्णालयात येतच नाहीत. त्यांना कंपल्सरी सात दिवस घरी थांबायचे आहे. कुठेही काहीही बंद करण्यात आलेलं नाही. ना शाळा बंद आहेत, ना सरकारी कार्यालय बंद आहेत, ना बाजार बंद आहे