नाना पाटील यांची रयत क्रांती संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष पदी फेरनिवड…

 

बुलडाणा – रयत क्रांती संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराला आदर्श मानुन शेतकरी कष्टकरी कामगार नोकरदार व समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय व हक्कासाठी काम करीत आहे या कार्यामध्ये मोलाची कामगिरी करीत संघटनेचा प्रचार व प्रसार करत असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यास काम करण्यास हिम्मत मिळावी या हेतूने पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येतात व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा तपासून कालांतराने या पदाच्या जबाबदारीमध्ये खांदेपालट केली जाते.

त्याच अनुषंगाने रयत क्रांती संघटनेची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी लवकरच तयार करण्याचे काही दिवसांपूर्वी घोषित करण्यात आले होते त्यानुसार दिनांक ०६ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर रयत क्रांती संघटनेचे एक आंदोलन होते त्याचवेळी काही महत्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या व त्यामध्ये रयत क्रांती संघटनेच्या बुलढाणा(घाटाखालील) जिल्हाध्यक्ष पदी श्री. नाना पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली.

यावेळी श्री .नाना पाटील यांना रयत क्रांती संघटनेच्या बुलढाणा(घाटाखालील) जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र माजी कृषीराज्यमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष रयत क्रांती संघटना मा .आ.श्री. सदाभाऊ खोत, कार्याध्यक्ष दिपकभाऊ भोसले,युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे,राज्य प्रवक्ते जीतूभाऊ अडेलकर, प्रा.सुहास पाटील व रयत क्रांती संघटनेची संपूर्ण कोअर कमिटी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी बोलतांना फेरनिवड झालेले जिल्हाध्यक्ष श्री.नाना पाटील म्हणाले की समाजातील सामान्य जनतेच्या समस्या सोडवतांना कुठलेही पद महत्वाचे नसते महत्वाची असतो तो प्रामाणिकपणा व जबाबदारीची जाणीव.

पुढे बोलतांना पाटील म्हणाले की माझी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली असली तरी जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता जिल्हाध्यक्षच आहे मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात पुढे असेन परंतु माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले कार्यकर्तेच खऱ्या अर्थाने जिल्हाध्यक्ष आहेत असे यावेळी नाना पाटील म्हणाले.

Leave a Comment