नांदुरा शहर व तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

विधात्याने घडवलेली सृजनांची सावली म्हणजे स्त्री. आदिशक्ती, प्रभूची भक्ती, झाशीची राणी, मावळ्यांची भवानी, प्रयत्नांना लाभलेली उन्नती, आजच्या युगाची प्रगती म्हणजेच स्त्री. या स्त्रीशक्तिच्या हक्कांचे रक्षण व स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन नांदुरा शहर व तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने सोमवार दि. ०८/०३/२०२१ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण, महिला सशक्तिकरण व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आदी विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नांदुरा शहरातील राजेंद्रजी डांगे यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा नामदार श्री चैनसुख संचेती तर प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उज्वलाताई संचेती तथा मार्गदर्शक म्हणून कोठारी महाविद्यालयातील शिक्षिका प्रा. प्रतिभाताई भोपळे आदी उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री चैनसुखजी संचेती तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन वृक्ष संवर्धनाचे महत्व प्रतिपादीत करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित प्रा. प्रतिभाताई भोपळे यांनी उपस्थित महिलांना ‘महिला सशक्तिकरण’ या विषयावर दिशादिग्दर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन हे भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. अर्चना शिवाजीराव पाटील व शहराध्यक्षा सौ. सारिका राजेशजी डागा यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनातून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नांदुरा शहर व तालुका भाजपा महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, परिसरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जेष्ठ व अन्य महिला, गृहिणी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होत्या.

___

Leave a Comment