नांदुरा येथे नवीन एम.आय.डी.सी. च्या जागेची स्थळ निश्चिती करून मंजुरीचा प्रस्थाव तात्काळ शासनास सादर करावा.- आमदार राजेश एकडे

 

नांदुरा ता. प्रतिनिधि – सुनील पवार

तालुका मुख्यालय असलेल्या नांदुरा येथे रेल्वे स्थानक असून नांदुरा शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे.तसेच नांदुरा येथिल बाजारपेठ देखील मोठी आहे. परंतु उद्योगधंद्यांना चालना मिळत नसल्याने नांदुरा तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तर अनेक सुशिक्षित बेरोजगारानी शहराची वाट धरली आहे.बेरोजगारांच्या हाताला काम व रोजगार मिळवून देण्याच्या अनुषंगाने *मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे* यांनी नांदुरा तालुक्यामध्ये नवीन एम.आय.डी.सी.मंजूर करावी अशी मागणी राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.श्री.सुभाषजी देसाई यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने काल दिनांक १२ फेब्रुवारी ला सायंकाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अमरावती चे प्रादेशिक अधिकारी श्री.राजारामजी गुठले
यांच्या समवेत  आमदार श्री.राजेश एकडे यांनी नांदुरा येथे एम.आय.डी.सी.मंजूर करणे बाबत सुजातपूर,आमसरी,आंबोडा, सांगावा वडी येथील जागेची पाहणी केली व नांदुरा येथे नवीन एम.आय.डी.सी.
च्या जागेची स्थळ निश्चिती करून सदर बाबातचा मंजुरीचा प्रस्थाव तात्काळ शासनास सादर करावा अश्या सूचना केल्या.यावेळी नांदूऱ्या चे तहसीलदार श्री.राहुल तायडे,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अमरावती चे सर्व्हेअर श्री.बंडू राठोड,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ खामगाव चे अभियंता श्री.धुर्वे,
मंडळ अधिकारी श्री.उगले, श्री.बंगाळे,तलाठी श्री.म्हस्के, शकील पटेल प्रामुख्याने उपस्थित होते….!!

Leave a Comment