नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-
मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राजेश एकडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून नांदुरा येथे तहसील ईमारत बांधकामस महसूल विभागाच्या दिनांक १७ फ्रेब्रू.२०२१
रोजीच्या शासन निर्णय निर्णयान्वये
( रु.८,०९,८९,२९) प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यासोबतच तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निवासस्थान बांधकामासाठी देखील रु.२,४८,०८,३९१ निधी उपलब्ध झाला आहे.तालुका मुख्यालय असलेल्या नांदुरा शहरातील तहसील कार्यालयाच्या ईमारतीमध्ये तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कामासाठी यावे लागते त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये या अनुषंगाने सध्या कार्यान्वित असलेले तहसील कार्यालयाची ईमारत ही अपूर्ण,सोइ सुविधाचा अभाव असणारी होती. तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विशेषता महिला कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये त्यांना कार्यालयात बसण्यासाठी मुबलक जागा असावी. त्याच प्रमाणे तहसील कार्यालय येणाऱ्या तालुक्यातील अभ्यंगतांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार श्री. राजेश एकडे यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री.बाळासाहेबजी थोरात यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सदर तहसील कार्यालयाची ईमारत व तहसीलदार,नायब तहसीलदार यांची निवासस्थान यांना प्रशासकीय मंजुरी मिळविली आहे.
मतदार संघातील विकास कामे जसे मोठी रस्ते व पूल, अंतर्गत रस्ते,शेत रस्ते,जलसंधारणाची कामे,नांदुरा एम.आय.डी.सी.
साठी पाठपुरावा ईत्यादी बाबत सुक्ष्म नियोजन करुन, नियोजनबद्ध पद्धतीने एक-एक विकास काम मार्गी लागत असल्याने जनमानसात व मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.