नांदगाव विधानसभा मतदार संघात माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यविषयक शिबिरे

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

नांदगाव साकोरे येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न मा ना श्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव तालुक्यात आरोग्य व शैक्षणिक दृष्ट्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन सौ विशाखाताई भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सदृढ व टिकून राहण्यास हवे महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आजारा बाबत आपल्या समस्या लवकर कोणाकडेच सांगत नाही व त्यामुळे महिलांना तनाचे व गर्भाशयाचे कॅन्सर होतात आणि प्रसंगी त्यांना आपला जीव ही गमवावा लागतो , आरोग्याच्या तपासण्या करण्यास महिला टाळाटाळ करतात म्हणून या सर्व बाबींचा विचार करून मेमोग्राफी व पॅपस्मिअर व्हॅन गावा गावात नेऊन महिलांची तपासणी व्हावी व त्यांचे आरोग्य अबाधित राहावे या उद्देशाने नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रोटरी क्लब मालेगाव मीडटाऊन रोटरी क्लब अमरावती मीडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिरे आयोजित करण्यात आली आहे त्याचा पहिला प्रयोग हा साकोरे गावात घेण्यात आला, त्यात 178 महिलांची तपासणी करण्यात आली त्यानंतर वेगवेगळ्या प्रमुख गावांमध्ये अशा प्रकारच्या शिबिरांची आयोजन करण्यात येणार आहे तसेच सदर कार्यक्रमात मोफत नेत्र तपासणी करून चष्मे देण्यात येणार आहे 370 लोकांची विद्यार्थ्यांसह तपासणी करण्यात आली त्याचबरोबर लॉक डाउन काळामध्ये विद्यार्थ्यांची अध्यापनाची परवड लक्षात घेऊन ग्रामीण भागातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्लासेस ची व्यवस्था नसल्यामुळे पुणे येथील आपणा क्लासेसच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोफत क्लासेस ची सेवा मिळवून देण्याची ही व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे त्याचेही प्रात्यक्षिक साकोरे गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत देण्यात आले आहे तसेच शुक्रवार रोजी बोलठाण आणि जातेगाव येथील शाळेतही प्रात्यक्षिक देऊन ऑनलाइन क्लासेसची व्यवस्था करून देण्यात येणार आहे तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, नांदगाव मतदार संघाने आमच्यावर आतापर्यंत भरभरून प्रेम केले आहे आपण राजकीय सत्ता येणे जाणे चालूच असते परंतु ज्या समाजाचं आपल्यावर खरे प्रेम असते त्यांचे आपण देणे लागतो या उद्देशाने आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहणार तरी या सर्व आरोग्य आणि शैक्षणिक सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे विशाखा ताई भुजबळ यांच्याकडून भाषणातून उपस्थितांना संबोधित करण्यात आले महिला विधानसभा अध्यक्ष डॉ नीलिमा अहिरे यांनी आपल्या भाषणातून महिलांनी आरोग्याची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे महिला या आपल्या कुटुंबाचा मुख्य कणा आहे त्यांच्याशिवाय कुटुंब हे अपूर्ण असते असे संबोधित केले महिला तालुका अध्यक्ष योगिता पाटील यांनी आपल्या दारात आलेल्या आरोग्याच्या संधीचा सर्व महिलांनी फायदा घ्यावा असे सांगितले मटका रोटरी क्लब मालेगाव सदस्य दीपक शेलार यांनी मॅमोग्राफी यांच्या बाबतीत विधानसभा अध्यक्ष विनोद भाऊ शेलार यांनी विशेष परिश्रम घेऊन इतपर्यंत येण्यास भाग पाडले असे सांगितले व आपण सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती केली त्यानंतर सौ विशाखा ताई भुजबळ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ ज्योती सिंग, दीपक शेलार प्रमोद वाघ रोटरी सदस्य मालेगाव, योगेश पाटील माजी नगराध्यक्ष मनमाड, घनश्याम सुरसे उपसरपंच साकोरा, दत्तू भाऊ पवार युवक जिल्हा उपाध्यक्ष , राजेंद्र लाठे ता अध्यक्ष सामाजिक न्याय सेल, राजाभाऊ सावंत न्यायडोंगरी गटप्रमुख, देविदास पगार साकोरा गट प्रमुख, किरण भाऊ बोरसे ग्रापं सदस्य साकोरा मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र सुरसे यांनी केले प्रसंगी अमित पाटील, देवदत्त सोनवणे, दया जुन्नरे विद्यार्थी शहर प्रमुख नांदगाव, उपसरपंच घनश्याम सुरसे,किरण बोरसे ग्रा प सदस्य, योगेश बोरसे युवक जिल्हा कार्याध्यक्ष, सुनील सुरसे शिवाजी सोनवणे, वृषभ बोरसे, चंद्रकला बोरसे महिला ता. उपाध्यक्ष, छाया बोरसे, निर्मला सुरसे,अलका हिरे यांनी विशेष परिश्रम घेतले व ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी श्री सरोदे व कर्मचारी सोमनाथ उडकुडे, समाधान वाघ,तसेच रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही सहकार्य सहकार्य केले. शेवटी अमित पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Comment