नवेगावबांध येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन,पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम

 

डावी कडवी विचारसरणी व नक्षल समस्या निर्मूलनाचा एक भाग म्हणून, नक्षलग्रस्त आदिवासी दुर्गम भागातील नवयुवक युवतींना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव मिळावा. याकरिता पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतून, अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी,प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या अध्यक्षतेखाली येथील पोलिस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दला अंतर्गत पोलीस ठाणे नवेगाव बांध येथे मिशन पोलीस भरती- 2020 पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 14 जुलै पासून सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात 80 प्रशिक्षणार्थी युवक युवक मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. संपूर्ण राज्यात व देशात कोरोना वायरस संसर्गजन्य साथ रोगाचा प्रादुर्भावात वाढ झालेली असून, सतर्कता बाळगणे आवश्यक झाले आहे. सुरक्षा व सतर्कता बाळगणे याबाबत केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तिच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. ह्या दृष्टिकोनातून, गोंदिया जिल्हा पोलीस दल रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मदत करीत असून, पोलीस व विविध सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे. हे येथे उल्लेखनीय आहे. दिनांक 23 सप्टेंबर रोज बुधवार ला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थी युवक-युवतींना मैदानी सरावा करिता मोफत स्पोर्ट शूज, ट्रॅक सूट चे वाटप उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी प्रशांत ढोले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी ठाणेदार पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे ,डॉ. टंडन वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आपल्या भाषणात, पोलीस भरती करिता लेखी परीक्षेची तयारी कशी करावी. विषयांची विशेषतः गणित व बुद्धिमत्ता, राज्य प्रशासन व सामाजिक चालू घडामोडी या विषयावरील पकड कशी मजबूत करावी. आपले जिल्ह्याची बारीक-सारीक माहितीचे अवलोकन कसे करावे. याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तर वैद्यकीय अधिकारी डॉ.टंडन यांनी covid-19 महामार्ग च्या काळात स्वतःचे आरोग्य अबाधित राखीत पोलीस पूर्व प्रशिक्षणाची तयारी कशी करावी. आरोग्य बाबत काळजी कशी घ्यायची. covid-19 संबंधाने सुरक्षा उपाय,सतर्कता व घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच इंजुरी फ्री शारीरिक व्यायाम कसा करावा, वार्म अप व कूलिंग डाऊन, स्वच्छतेचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींनी योग्य खानपान, डायट, पुरेसी विश्रांती तसेच ताजेतवाने असण्याचा कालावधी याची ओळख करून दिली. स्पर्धा व भरतीची तयारी तसेच उत्कृष्ट अभ्यास व स्वाध्याय कसा करता येईल. याबाबत ठाणेदार दिनकर ठोसरे यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाईक पोलीस शिपाई जनार्दन कुसराम यांनी केले.
जागतिक स्वास्थ्य संस्था प्रणित गाईडलाईन, covid-19 आदर्श मानक व सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करून, किट साहित्य वाटप करून, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी प्रशांत ढोले यांच्या हस्ते नक्षत्र वृक्षारोपण पोलीस ठाण्याच्या आवारात करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Leave a Comment