SURYA MARATHI NEWS
नवी दिल्ली – राजस्थानच्या पोखरणमध्ये फसवणुकीची एक अजब घटना समोर आली आहे. तर या अवघ्या सात दिवसांत एक नवरी पैसे आणि दागिने घेऊन पसार झाल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच ही घटना घडल्याने नवरी जोमात आणि नवरदेव कोमात असंचं म्हणावं लागेल. तरी
यामुळे नवरदेवाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. या लग्नानंतर नववधूने पतीसोबत शरीरसंबंध ठेवायलाही नकार दिल्याने लग्नाच्या आठव्या दिवशी तब्येत बिघडल्याचा बहाणा करत ती घरातून चक्क पसार झाली. व तसेच हे लग्न जमवणारा मध्यस्थी म्हणून असलेला व्यक्ती देखील तेव्हापासून गायब आहे.
या मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणाऱ्या बाबूरामचं शांती नावाच्या एका तरुणीशी लग्न झालं होतं. जगमाल सिंह या मध्यस्थाच्या मदतीनं हे लग्न जमलं होतं आणि मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आर्य मंदिरात हा विवाह पार पडला. त्यानंतर घरी आलेल्या नववधूचं वागणं पाहून बाबूरामलाही थोडा धक्का बसला. तिनेनलग्नानंतर शारीरिक संबंध ठेवायला नकार दिला होता. काहीतरी बहाणा सांगून तिने काही दिवसांनी संबंध ठेवण्याची विनंती केली होती.या पत्नीच्या इच्छेचा आदर करत बाबूरामनेही ही गोष्ट मान्य केली होती. परंतु या
लग्नानंतर आठव्याच दिवशी संसार मोडला
व या लग्नाच्या आठ दिवसांपर्यंत ते दोघे एकाच घरात राहत होते, मात्र त्यांच्यामध्ये पती-पत्नीसारखे कोणतेही संबंध नव्हते. लग्नाच्या आठव्या दिवशी आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगत शांतीने उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची विनंती केली. मात्र रुग्णालयामध्ये गेलेली शांती पुन्हा घरी आलीच नाही. बाबूरामने तिला खूप वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन बंद येत होता. बाबूराम जेव्हा तिचा शोध घेऊन घरी आला, तेव्हा त्याच्या घरातील सर्व पैसे आणि दागिने गायब होते. नवरदेवची सर्व संपत्ती लुटून शांतीने पळून गेल्याचं त्याच्या नवरदेवाची लक्षात आलं. म्हणून की घरातले
सात लाख रोख रक्कम आणि साडे तीन लाखांचं सोनं घेऊन नवरी पसार
पत्नीने आपली फसवणूक केल्याचं समजताच त्याने मध्यस्थ असणाऱ्या जगमाल सिंहला फोन केला. मात्र त्याचा फोनदेखील बंद असल्यामुळे अखेर त्याने पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मध्यस्थ आणि पत्नी शांती हे एकमेकांचे साथीदार असण्याची शक्यता वर्तवली आहे. बाबूरामने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, जवळपास सात लाख रोख रक्कम आणि साडे तीन लाखांचं सोनं घेऊन शांती पळून गेल्याचं म्हटलं आहे. व नवर देव ची घाव पोलीस स्टेशन मधे या दोघांचा सध्या शोध घेत असून अधिक तपास करत आहेत. ही एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. Surya marathi news