नगरपालिका प्रशासन जीवित हानी झाल्यावर पूल दुरुस्ती करणार का ?

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- शास्त्री वार्ड प्रकाश दाळ मिल रोडवरील पूल जून जुलै च्या महिन्यात अतिवृष्टी पाऊस पडल्यामुळे पूल पूर्ण खराब झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या ज्या जीवाला धोका निर्माण झाला आहे . या पुलामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे हिंगणघाट नगरपालिका प्रशासनाने या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी , येथील जागरूक स्थानिक रहिवासी अजय परबत यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून समोर आणली . हिंगणघाट नगर पालिका प्रशासन यांनी तात्काळ पूलाची दुरुस्ती करावी . याबाबत तीन महिने झाले तरी नगरपालिका प्रशासना कडून याच्या दुरुस्ती बाबत कोणतीही भूमिका घेतली नाही या बाबत अजय परबत हे मुख्याधिकारी यांना निवेदन देणार आहे.

Leave a Comment