नगरपालिका कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक ; न प कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

0
423

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव: येथील गांधी चौकामध्ये असलेल्या नगर पालिका कार्यालयाच्या इमारतीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शेगाव नगरपालिका कार्यालयात दररोज प्रमाणे कामकाज सुरू होते अज्ञात समाजकंटकांनी दुपारी साडेबारा एक वाजे दरम्यान नगरपालिका इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक करून दरवाज्याचे काच फोडले.
या घटनेमुळे नगरपालिका कार्यालयात उपस्थित कर्मचारी व इतर कामानिमित्त आलेल्या शहरवासीय मध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसत होते या घटनेच्या निषेधार्थ शेगांव नगरपालिका कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले त्यामुळे नगरपालिका कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. या घटनेच्या विरोधात शेगांव नगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने शेगाव शहर पोलीस स्टेशनला जाऊन लेखी स्वरूपात तक्रार वजा निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये नगरपालिका इमारतीवर दगडफेक करून प्रवेशद्वाराचे तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे या तक्रारी वजा निवेदनावर विजयकुमार आश्रमा, एसएस बोबडे, एस पी इंगोले ,पालीवाल, देशमुख यांच्यासह ईतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here