नगरपरिषद हिंगणघाटने राबविले खिळे मुक्त झाड अभियान –

 

– हिंगणघाट
दि. ०२ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त व सेवा पंधरवाडा अंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या झाडांना असलेले खिळे, अनाधिकृत छोटया पाटया, बोर्ड काढण्याची मोहिम नगर परिषदेने राबविली असुन त्या मोहिमेला वृक्ष मित्र परिवार यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे मोहिम यशस्वी ठरली त्यावेळी सुमारे ८७ छोटे बोर्ड, १७८ छोटे / मोठे खिळे, तार काढण्यात आली.
सदर मोहिम नगर परिषद मुख्याधिकारी श्री. हर्षल गायकवाड यांच्या नियंत्रणात, प्रशासकिय अधिकारी श्री. निलेश शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली, उद्यान पर्यवेक्षक श्री. प्रविण काळे यांचे वतीने राबविण्यात आली. सदर मोहिमेची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथुन सकाळी ९.०० वाजता करण्यात आली, सर्व प्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळयास व लाल बहादुर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले, त्यानंतर मोहिम सुरु करण्यात आली. मोहिम यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी श्री. राजु कोल्हे, श्री. विठठल कामडी, श्री. सतिश झक्कणवार, श्री. विजय वानखेडे, श्री. दिपक चंदनखेडे व वृक्ष मित्र परिवार यांचे तर्फे श्री. उमेश मंगळुरकर, श्री. गोपाल मांडवकर, श्री. विठठल गुळघाणे, श्री. गजु कुबडे, श्री. सुनिल डोंगरे, श्री. धनंजय बकाने, श्री. नितिन शिंगरु, श्री. राजु कारवटकर, श्री. प्रेमकुमार पालीवाल, श्री. वासुदेव पडवे, श्री. रतन पटेल, श्री. मिलिंद कोठेकर, श्री. राजु रुपारेल, श्री. दर्शन बाळापुरे, श्री. चंद्रकांत ननंदकर, श्री. गोपाल यादव, श्री. नितिन क्षिरसागर, श्री. धनराज कुंभारे, श्री. दिपक जोशी, श्री. राकेश झाडे, श्री. नरेन्द्र मेघरे, तुषार हवाईकर, श्री. दिनेश वर्मा, श्री. रुपेश लाजुरकर, श्री. किशोर पांडे, श्री. शुभम घोडे, श्री. नितिन भांडे, श्री. देवा जोशी, श्री. सचिन एलकुंचेवार, श्री. हरीष त्रिवेदी, श्री. विजय चंदनखेडे, श्री. अतुल नंदागवळी, श्री. आसीफ अली. श्री. प्रशांत वैघ, मोहन पिरकुंडे, श्री. सुरज कुबडे, श्री. नैतिक मुन, श्री. रंजित जिवणे, श्री. राम मिहाणी, श्री. मनिष शितलांगे, श्री. सुरेंद्र टेंभुर्णे, श्री. राजु खांडरे, श्री. गौरव तांबोळी, श्री. सतिश गौळकार, श्री. रवि रोहणकर, श्री. संजय कारेकर, श्री. अमोल वाघमारे व सर्व वृक्ष मित्र परिवार व श्री. आशिष भोयर, पर्यावरण संवर्धण संस्था यांनी मोहिम यशस्वी करण्यासाठी खुप मदत केली.
नगर परिषदेतर्फे शहरातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, झाड आपल्या घरासमोर / आस्थापने / दुकानासमोर असल्यास त्याच्यावर बोर्ड, खिळे, तार लावु नये जेणे करुन वृक्षाची वाढ व्यवस्थित होईल व वृक्षाची जोपणास होईल.
वृक्ष प्रेमी / वृक्ष मित्र यांनी संकल्प केला की, एक बि लावली नं… त्याचं झाड होते, आणि एक झाड लावलं तर त्याचं वटवृक्ष होते, या वाक्यासह शहर हिरवेगार करण्याचा मानस असल्याचे सामारोप करण्यातांना सर्वांनी संकल्प करुन कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Comment