धावत्या रेल्वे समोर उडी मारून इसमेची आत्महत्या

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

धावत्या रेल्वे समोर उडी मारून इसमाने आत्महत्या केल्याची घटना ओळखली झाली आहे याबाबत रेल्वे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव नागझरी लोहमार्गावर खंबा किलोमीटर नंबर ५४७/२० या ठिकाणी रेल्वे समोर उडी मारून धनगर नगरातील इसमाने आत्महत्या केल्याप्रकरणी शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे .

याबाबत रेल्वे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव रेल्वे स्टेशनचे डेप्युटी स्टेशन मास्तर यांनी दिलेल्या मेमो मध्ये माहिती दिली की ट्रेन क्रमांक 12 844 च्या लोको पायलेट ने माहिती दिली की शेगाव नागझरी रेल्वे स्टेशनच्या मदत लोहमार्ग किलोमीटर नंबर ५४७/२० वर एका इसमाने गाडी समोर येऊन आत्महत्या केली.

याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलीस विभागातील आरक्षक समाधान गवई घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर प्रेताची पाहणी केली असता कमरेवर मार लागलेला दिसला सदर मृतकाची ओळख धनगर नगरातील हेमंत संभाजी खांडेकर 43 असल्याचे समजले या प्रकरणी शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी अधिक तपास शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे ए एस आय लंकेश्वर करीत आहेत

Leave a Comment