गोंदिया-शैलेश राजनकर
देवरी पोलिसांची मोठी कारवाई
देवरी 9: अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गोपनीय माहिती मिळाली कि राजनांदगाव येथून ट्रक मध्ये प्रतिबंधित पान पराग मसाला भरून अमरावती करीता निघालेला आहे या माहितीच्या आधारे देवरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी चिचगड टी पॉईंट वर नाकेबंदी करून वाहने तपासणी करीत असतांना ट्रक क्र GJ 37-/त-9921 यामध्ये प्रतिबंधित पान पराग मसाला 35 बॉक्स ज्यामध्ये 90 ग्रम वजनाचे 21000/- पॅकेट आढळून आले .
मालाची किंमत 2517600/- रुपये असून बिलासंबंधी विचारले असता कुठलेही कागद पत्र आढळून न आल्याने पो स्टे ला डिटेन करून ठेवण्यात आला आहे .
ट्रकमधील प्रतिबंधीत पान परागबाबत अन्न सुरक्षा सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, भंडारा, यांना पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यांनी संपुर्ण मालाची तपासणी करुन त्यांचा लेखी अहवाल व रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन देवरी येथे आरोपी हसन सलेमान रुखडा, वय 40 वर्ष, रा. खंबालिया, देवभूमी द्वारका, गुजरात यांचेविरुध्द अप.क्र. 89/2021 कलम 188, 272, 273,328 भा.द.वी. सहकलम अन्न सुरक्षा व मानदे कायदयाचे कलम 3(1) (झेडझेड)(iii), कलम 26(i), कलम 26(2)(i), कलम26(2)(iv), कलम 27(3)e), कलम 30(2)(ए), कलम 59 या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे पुढील तपास पोनि. सिंगनजुडे सा. करीत आहेत.
नमुद गुन्ह्यामध्ये प्रतिबंधीत पान मसाला एकुण किमत 25,17,600/- रु. व ट्रक क्र. GJ-37/ T-9921 किमती 15,00,000/-रु असा एकुण 40,17,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक सो. गोंदिया ,जांलधर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगांव, अति.कार्य, देवरी यांचे मार्गदर्शनात पोनि. सिंगनजुडे, पोउपनि. उरकुडे, पोना. बोहरे, पोशि. कांदे, पोशि. भांडारकर, यांनी केली आहे.