देऊळगाव साकर्शीच्या डॅम वरील धबधब्यावर नागरिकांची तोबा गर्दी वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती

 

 

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील धरण भरल्यानंतर ओसंडून वाहणारा कालवा हा जणू काही पर्यटकाचा लक्ष आकर्षित करताना दिसतय हजारोच्या संख्येने रोज त्या ठिकाणी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील सुद्धा नागरिक याठिकाणी येताना दिसत आहे आणि त्या ठिकाणी येऊन त्या कालवून पडणाऱ्या पाण्यामध्ये मनसोक्त आनंद त्या कालव्यावर घेत आहेत अनेकांचे फोटोशूट, पावसात पडताना चे व्हिडिओ मस्ती करतानाचे व्हिडिओ हे जरी आपल्याला पाहतांना चांगलं वाटत असले ही व आपल्या परिसरात एक निसर्गरम्य वातावरण तयार झाले की काय असे जरी वाटत असल पण हे सध्याच्या घडीला धोकादायक ठरू शकते कारण जिल्ह्यांमध्ये झपाट्याने कोरोणाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढतो आहे आणि अशा वेळेस हजारोच्या संख्येने पर्यटक एकाच ठिकाणी येत असतील आणि त्यामध्ये कोणीकडुन ही कोणत्याही गोष्टींचे पालन केल्या जात नसेल तर अशा वेळेस तो स्पॉट कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरण्याची भीतीही नाकारता येत नाही म्हणून नागरिकांना आव्हान आहे की अशा वेळेस आपण स्वतःची आपल्या परिवाराची व मित्रपरिवार याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे असे आपल्याला वाटत नाही का ? आणि म्हणून त्याठिकाणी जात असताना सर्व गोष्टीचा पालन करावे पण खरच असं होताना त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून संबंधित प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन या संबंधित बाबींवर अंकुश लावावा जेणेकरून संभाव्य धोका आपल्याला टाळता येईल अन्यथा आता मोठा धोका त्या ठिकाणाहून बाहेर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.आणि तोच परिसर कोरोणाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती सुद्धा नाकारू शकत नाही म्हणून संबंधित प्रशासनाने त्या ठिकाणावर जाऊन काही निर्बंध लावावेत अशी मागणी परिसरातील नागरिका करताना दिसत आहे.

Leave a Comment