सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
कोरोना च्या वाढता प्रादुर्भाव बघता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत नियम व अटी घालून दिल्याप्रमाणे लॉक डाऊन सुरू आहे ‘ कोरोना ची संख्या वाढली तर परत पहिल्यासारखे कडक लॉक डाऊन होईल ‘या भीतीपोटी चोरीचे प्रमाण सुद्धा वाढलेले दिसून येत आहे .तालुक्यातील दुसरबीड येथील मुंबई – नागपूर या हायवेवर असलेल्या सचिन वाईन बार मध्ये अज्ञात चोरट्यांनी 23 फेब्रुवारी च्या मध्यरात्री 2 वाजता चोरी करून काही विदेशी दारू व १५७३० असा एकूण ३० ते ३५हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला,अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेली सचिन वाईन बार होती ‘दुसरबीड मधील सतत चोर्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .सचिन बारचे मालक संदीप देसाई यांनी किनगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली . व तक्रार दाखल होताच ‘किनगाव राजा चे पीएसआय माळी साहेब व दुसरबीड बीड बीट जमदार चाटे साहेब व पोलीस कॉन्स्टेबल बारगजे यांनी घटनास्थळी घटनेचा जाऊन पंचनामा केला ‘गावांमध्ये होणारे चोऱ्या याला आळा घालण्यात यावी अशी मागणी या वेळी नागरिकांनी केली आहे . ‘